Mumbai Railway Mega Block : रेल्वेचा रविवारी मध्य, पश्चिम, हार्बर तिन्ही मार्गा मेगाब्लॉक
•रेल्वेच्या अभियांत्रिक व देखभाल दुरुस्ती काम करिता तिन्ही मार्गावर रेल्वेच्या मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर जाताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
मुंबई :- रविवारी (26 मे) मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात रेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर घेतला जाणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणारी आणि सीएसएमटीकडे येणारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा – ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत.
सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक असेल
सकाळी 10.14 ते दुपारी 3.09 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. पुढे ठाणे स्थानकांवर डाऊन स्लो मार्गावर वळवल्या जातील. लोकल 15 मिनिटे विलंबाने धावतील. सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत असणार आहे. सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी – वांद्र,गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणीसाठी शनिवारी रात्री 1.10 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लॉक असणार आहे. लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.बोरिवली-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. अंधेरी आणि बोरिवली लोकलला हार्बर मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच बोरिवली फलाट क्रमांक 1 ते 4 वरून धावेल.