Mumbai Railway Accident : रेल्वेने प्रवास करणे एका महिलेच्या जीवावर बेतले… रेल्वे अपघातात महिलेचा प्राण वाचला परंतु…

Mumbai Railway Accident : मुंबईत अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, रेल्वेसेवा कोळंबली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दीचा लोट, रेल्वे पकडताना महिलेचा अपघात प्राण वाचला मोठे नुकसान
मुंबई :- रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई,पालघर रायगडसह कोकणात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे. Mumbai Rain मुंबईत सुमारे सहा तासातच 300 मिमी पाऊस झाला आहे. मुंबईच्या या पावसामुळे मुंबईकरांना आणि चाकरमान्यांना चांगलेच हाल सहन करावे लागले आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईची लाईफ लाईन असलेले रेल्वे Mumbai Railway वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला अनेक लोकल रद्द करण्यात आले तर अनेक मार्गांवर पाणी साचल्याने बंद करण्यात आले त्याचा परिणाम म्हणून रेल्वे स्थानकावर प्रचंड चाकरमानांची गर्दी झाली होती.याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे. Mumbai Railway Accident
पनवेलवरुन ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात आली. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एक महिला प्रवाशाचा पाय घसरला आणि ती रेल्वे रूळांवर पडली.
यादरम्यान रेल्वेचा पहिला महिला डब्बा महिलेच्या अंगावरुन गेला. मात्र, प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने लगेचच मोटरमनने प्रसंगावधान राखत रेल्वे मागे घेतली. त्यामुळं सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. मात्र, या अपघातात महिलेला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. या अपघातामुळं प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. Mumbai woman survives after local train runs over her, loses legs
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे हार्बरवर अनेक रेल्वे उशिराने धावत होत्या. तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यातच अनेक तासापासून बेलापूर वरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती.
रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. याच गर्दीत लोकल पडकत असताना महीलेचा पाय घसरून ती रेल्वे रुळावरुन पडली. त्याचवेळी तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे. Mumbai woman survives after local train runs over her, loses legs