मुंबई

Mumbai Pune Road Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

•ट्रकचालक याचा अपघातात मृत्यू

पनवेल :- मुंबई पुणे महामार्गावर अनेक भीषण अपघात होत आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना वाहनांचे नियमन पाळण्याचे वारंवार आवाहन केले जाते. वेगावर मर्यादा ठेवण्याचे सूचनाफलक महामार्गाच्या रस्त्यांच्या बाजूला दर्शविले जाते परंतु अनेक वेळा वाहन चालक यांचे नियमाचे उल्लंघन करून वाहन चालवत असतात त्यामुळे अपघात होण्याचे अटळ शक्यता वर्तवली जाते. मुंबई पुणे या महामार्गावरून जाणाऱ्या एका टेम्पोचा भीषण अपघात काल रात्री 10.50 च्या सुमारास पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पुणे महामार्गावर झाला आहे. या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता.

शेख यासीनभाई अहमदभाई (48 वर्ष) आपला टेम्पो पुण्याच्या दिशेने घेऊन जाताना मुंबई पुणे महामार्गावर अतिशय वेगाने असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पुढील वाहनास जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी आय आर बी रुग्णवाहिकेमधील डॉक्टर मंगेश भगत यांनी तपासून पाहणी केली असता त्यांना मृत घोषित केले. या अपघात ठिकाणी आय आर बी स्टाफ देवदूत टीम, पोलीस उपनिरीक्षक राजपूत पनवेल मोटर वाहन निरीक्षक संदीप कोतकर यांनी घटनास्थळी पाहणी करून अपघातग्रस्त टेम्पो आय आर बी च्या क्रेनच्या साह्याने बाहेर काढला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago