Mumbai Powai News : मुंबईत पोलिस आणि BMC अधिकाऱ्यांवर दगडफेक, काय आहे प्रकरण?
Mumbai News Powai Area Stone Pelting On Police And Palika Adhikari : मुंबईतील पवई परिसरात पोलीस आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, दगडफेकीत अनेक अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई :- पवई परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलिस आणि बीएमसी Mumbai BMC अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही पोलीस Mumbai Police आणि बीएमसीचे Mumbai BMC अधिकारी जखमी झाले आहेत. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. एका बाजूला पोलीस बंदोबस्त आहे तर दुसरीकडे काही लोक दगडफेक करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, “पवई परिसरात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान पोलिस आणि बीएमसी अधिकाऱ्यांवर झालेल्या दगडफेकीत काही पोलिस जखमी झाले आहेत. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे.” महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी एकच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर बीएमसीने अतिक्रमणविरोधी कारवाई तात्काळ थांबवली आहे. “पवईच्या जय भवानी नगरमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असताना स्थानिक लोकांनी पोलिसांवर आणि BMC टीमवर दगडफेक केली,” असे अधिकारी म्हणाले. Mumbai News Powai Area Stone Pelting On Police And Palika Adhikari
या अधिकाऱ्याने सांगितले की, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणारे काही पोलिस दगडफेकीत जखमी झाले आहेत. दगडफेकीच्या घटनेची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये महिला आणि पुरुषांचा एक गट पोलिस आणि बीएमसी कर्मचाऱ्यांवर दगडफेक करताना दिसत आहे. दगडफेकीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी पोलीस पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचेही यावरून दिसून येते. Mumbai News Powai Area Stone Pelting On Police And Palika Adhikari
Web Title : Mumbai Powai News : Stone pelting on police and BMC officials in Mumbai, what is the matter?