Vasai Crime News : बिहार पोलिसांना 3 वर्षांपासून चकवा देणारा ‘2 लाखांचा इनामी’ कुख्यात गुंड वसईत जेरबंद

Vasai Crime Branch Latest News : एक-47 बाळगणाऱ्या बुट्न चौधरीला गुन्हे शाखेने पकडले; मुंबई आणि बिहार पोलिसांची संयुक्त कारवाई यशस्वी
वसई :- बिहारमध्ये खून, दरोडा, आणि सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या एका अत्यंत कुख्यात गुंडाला, ज्याच्यावर बिहार सरकारने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, त्याला वसई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आणि एके-47 सारखी प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या बुट्न चौधरी उर्फ हरेंद्र चौधरी याला पकडण्यासाठी मुंबई आणि बिहार पोलिसांनी एक विशेष संयुक्त मोहीम राबवली. Vasai Latest Crime News
ही थरारक कारवाई 16 ऑगस्ट रोजी सुरू झाली. बिहार पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्स (STF) पथक बुट्न चौधरीचा शोध घेत वसईत पोहोचले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा कक्ष-2शी संपर्क साधून मदतीची विनंती केली. आरोपी अत्यंत सराईत असून पोलिसांची चाहूल लागताच तो भूमिगत होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुन्हे शाखा कक्ष-2 Vasai Crime Branch Unit 2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी तात्काळ या आव्हानाचा स्वीकार केला. त्यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून बिहार पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी वेषांतर करून तपास केला. अखेर, 24 तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर पोलिसांना बुट्न चौधरी तुंगारेश्वर येथील एका मंदिराजवळ लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीवर विश्वास ठेवत पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी पहाटे सापळा रचला आणि बुट्न जनेश्वर चौधरी (वय 50) याला ताब्यात घेतले. त्यानंतर बिहार पोलिसांनी त्याला अधिकृतपणे अटक केली.या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी अत्यंत भयानक आहे. त्याच्यावर खून, दरोडा आणि सरकारी अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्यांसारखे 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, 2016 साली त्याच्या ताब्यातून एके-47 आणि हँड ग्रेनेड बॉम्ब सापडले होते आणि त्याला त्या प्रकरणात शिक्षाही झाली होती.
ही नेत्रदीपक कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात वसई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते आणि बिहार पोलिसांचे पोलीस निरीक्षक अजित कुमार, पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुमार, उत्तम कुमार, बिनीत कुमार यांचा महत्त्वाचा सहभाग होता. याशिवाय, सहायक फौजदार मुकेश पवार, रविंद्र पवार, चंदन मोरे, मनोज मोरे आणि इतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.


