Mumbai Lok Sabha Election Update : मतदानाच्या दिवशी कलम 144 लागू
Mumbai Police Use Section 144 Near Mumbai Lok Sabha Voting Center To Control People : पोलीस उप आयुक्त अकबर पठाण मतदान केंद्राबाहेर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई :- महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील Mumbai Lok Sabha Election Phase 5 म्हणजे शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. हे मतदान शांतता व सुरक्षित पार पाडावे याकरिता पोलिसांकडून चांगलीच कंबर कसली जात आहे. निवडणूक आयोगाकडूनही Election Commission तशा सूचना पोलिसांना दिले आहे कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी होणार नाही याची दक्षता म्हणून कलम 144 Section (144 Near Voting Center) लागू करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात विनाकारण गर्दी लोकांचे घुसमट किंवा घोषणाबाजी देता येणार नाही याची जबाबदारी पोलिसांकडे देण्यात आली आहे त्यावर पोलिसांकडूनही आता अध्यादेश काढला आहे. Mumbai Lok Sabha Election Live Update
मतदान केंद्रावर मतदान होणार असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात उमेदवार नसलेली कोणतीही व्यक्ती किंवा अशा उमेदवाराचा मान्यताप्राप्त एजंट किंवा निवडणुकीशी संबंधित अधिकारी किंवा कर्तव्यात गुंतलेला कोणताही सार्वजनिक सेवक नसलेली कोणतीही व्यक्ती अशा मतदान केंद्राच्या परिसरात 20 मे 2024 रोजी सकाळी 06.00 ते मध्यरात्री 12 च्या दरम्यान, महामार्ग, रस्ता, गल्लीबोळ, किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा Mumbai Lok Sabha Election Live Update
(१) 31- दक्षिण मुंबई
(२) 30 दक्षिण मध्य मुंबई
(३) 29- उत्तर मध्य मुंबई
(४) 28 उत्तर पुर्व मुंबई
(५) 27 उत्तर पश्चिम मुंबई
(६) 26 उत्तर मुंबई
मतदारसंघातील कोणत्याही मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरात घुटमळणार, फिरणार अथवा गर्दी करणार नाही.
मतदानाच्या उद्देशाने मतदान केंद्राला भेट देणाऱ्या सर्व इच्छूक मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या पाहिजेत, एक पुरूषांसाठी आणि दुसरी महिलांसाठी आणि प्रत्येक इच्चडूक मतदाराने मतदान केंद्रात त्याच्या किंवा तिच्या क्रमवारीत प्रवेश केला पाहिजे. असे निर्देश पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी दिले आहे. Mumbai Police Use Section 144 Near Mumbai Lok Sabha Voting Center To Control People