•अप्पर आयुक्त महेश पाटील यांच्यासह 12 जणांना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बहुमान; पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन
मुंबई l प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारत सरकारमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक 2026’ ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बृहन्मुंबई पोलीस दलातील 12 अधिकारी व अंमलदारांना या पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पदक प्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करत त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
उल्लेखनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (PPM)
अत्यंत खडतर आणि विशेष कामगिरी बजावणाऱ्या खालील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे मानाचे पदक जाहीर झाले आहे.
1) श्री. महेश उदाजी पाटील – अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई.
2) श्री. बाळकृष्ण मोतीराम यादव – पोलीस उप आयुक्त, बिनतारी संदेश विभाग, मुंबई.
3) श्री. सायरस बोमन इराणी – सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, मुंबई.
गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ‘पोलीस पदक’ (PM)
पोलीस दलातील प्रदीर्घ आणि निष्ठेच्या सेवेबद्दल खालील नऊ अधिकाऱ्यांना पदक घोषित झाले आहे:
1) श्री. पुरुषोत्तम नारायण कराड – पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे शाखा, मुंबई.
2) श्री. महेश रमेश तावडे – सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, मुंबई.
3) श्रीमती सुवर्णा उमेश शिंदे – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई.
4) श्री. विजय गोपाळ मोहिते – पोलीस उप निरीक्षक, चुनाभट्टी पोलीस ठाणे, मुंबई.
5) श्री. सतीश जनार्दन निंबाळकर – पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई.
6) श्री. मनोज यशवंत गुजर – पोलीस उप निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई.
7) श्री. अजय मनोहर सावंत – पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई.
8) श्री. बाबासाहेब नाथा ढाकणे – पोलीस उप निरीक्षक, संरक्षण व सुरक्षा विभाग, मुंबई.
9.) श्री. शिवदास दत्तात्रय फुटाणे – पोलीस उप निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे, मुंबई.
मुंबई पोलिसांच्या कामगिरीची दखल: यंदाच्या यादीत सायबर क्राईम, ट्रॅफिक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. विशेषतः सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सन्मानामुळे मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…