क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करणं भोवलं; मुंबई पोलिसांकडून 13 जणांवर कारवाई

Mumbai Police Take Action On Drink And Drive Driver : ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्या 13 जणांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे, लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याचे कारवाई

मुंबई :- 13 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. Mumbai Traffic Police दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. Mumbai Police Take Action On Drink And Drive Driver

मद्यपान करुन गाडी चालविणे हा गुन्हा असला तरी मुंबईत ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमधूनच हिट अँड रन सारख्या घटना घडतात.बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढते आहे. मद्यपान करुन वाहन चालविल्याबद्दल चालकांला पहिल्या गुन्ह्यांबद्दल 6 महिने तरुंगवास किंवा 2 हजार रुपयांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासाठी 3 हजार रुपयांचा दंड आणि 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होते.

रविवारी 13 एप्रिलच्या मध्यरात्री मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 125 अन्वये एकुण 13 दखलपात्र गुन्हे पोलीस ठाणेस दाखल करण्यात आले आहेत. गुन्हयातील मद्यपी आरोपींचे लायसन्स रदद् अथवा निलंबन करण्याची प्रक्रियासुध्दा सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0