क्राईम न्यूज

Mumbai Police News: परिमंडळ-5 कार्यालय सह सहायक पोलीस आयुक्त दादर, माहिम, कुर्ला विभाग कार्यालय व दादर, शिवाजीपार्क, माहिम, शाहुनगर, धारावी, कुर्ला, विनोबा भावे नगर पोलीस ठाणे या सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ

Mumbai Police Latest News : कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, नियोजन, कामाची गती या विविध 14 निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परिमंडळ-5 पोलीस उप आयुक्त गणेश गावडे कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळालेले आहे.

मुंबई :- मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ 5 कार्यालयासह सहायक पोलीस आयुक्त दादर, माहिम, कुर्ला विभाग कार्यालय व दादर, शिवाजीपार्क, माहिम, शाहुनगर, धारावी, कुर्ला, विनोबा भावे नगर पोलीस ठाणे सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. Mumbai Police News स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन, कामाची गती या विविध 14 निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.परिमंडळ-5 पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन मिळाले आहे. Mumbai Police Latest News

मोहिमेदरम्यान परिमंडळ 5 कार्यालय व परिमंडळ 5 मधील सहायक पोलीस आयुक्त दादर, माहिम, कुर्ला विभाग कार्यालय व दादर, शिवाजीपार्क, माहिम, शाहुनगर, थारावी, कुर्ला, विनोबा भावे नगर पोलीस ठाणे यांनी सर्व निकषांची पुर्तता करताना कामकाजाचा स्तर वाढविला आहे. तसेच ISO 9001:2015 (Quality Management System) चे निकषांची पुर्ततादेखील केल्याने अब्युल्युट कन्सल्टंटस या संस्थेने रितसर तीन टप्प्यात पाहणी करून परिमंडळ 5 कार्यालय, तसेच परिमंडळ 5 मधील सर्व सातही पोलीस ठाणे यांना ISO 9001:2015 (Quality Management System) प्रमाणपत्र प्रदान केले आहे. पाहणी दरम्यान कार्यालयीन कार्यपध्दती, अभिलेख जतन पध्दती, स्वच्छता, नागरिकाकरिता देण्यात येणारे सुविधा या व इतर विविध निकषांचा आढावा घेवून त्यात आवश्यकतेनुसार सुचविलेल्या बदलांची पुर्तता करण्यात आली आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु), सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, अनिल पारसकर यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ-5, मुंबई पोलीस उप आयुक्त, गणेश गावडे, परिमंडळ-5 अंतर्गत सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त व सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago