•Tobacco-free campaign by Mumbai Police तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल 257 शाळा, 38 महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली.
मुंबई :- शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी परिमंडळ-7 पोलिसांनी मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल 257 शाळा,38 महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली आहे.तसेच 100 मीटर परिसरातील दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा-या 187 शासनमान्य दुकानांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करु नये म्हणून नोटीस देण्यात आली व 45 अतिक्रमण पानटपरीचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.295 पैकी 203 फलक पोलीस प्रशासनाने पुढाकाराने लावले.मनपाच्या मदतीने निष्काशन करण्यात आले. तसेच कायदयाचे उल्लंघन करणा-या इसमांविरुध्द 635 केसेस करुन रुपये 1.27 लाख इतका दंड आकारण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या शंभर दिवस कृती आराखडया अन्वये संपूर्ण शैक्षणिक संस्थेचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यात राबवल्या जात आहे. या अभियानाची काटेकोर अंमलबजावणी पोलीस आयुक्त, मुंबई विवेक फणसळकर, परिमंडळ-2 पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.सर्व शाळा, कॉलेजचा परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या. संस्था परिसरात धूम्रपान निषेध बोर्ड लावणेबाबत सूचित करण्यात आले.
शालेय परिसर तंबाखूमुक्त मोहिमेचा समोरीपीय कार्यक्रम गुरुवारी (27 मार्च) रोजी महाकवी कालीदास नाटयगृह, मुलुंड पश्चिम मुंबई येथे मा. अपर पोलीस आयुक्त, डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7 विजयकांत सागर, सिने अभिनेता पुष्कर श्रोत्री, हास्य कलाकार गौरख मोरे परिमंडळातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शिक्षकवर्ग व शालेय विदयार्थी, एन.जी.ओ प्रतिनिधी, प्रसार माध्यम प्रतिनिधी यांचे उपस्थितीत परिमंडळ 7 मधील शालेय परिसर तंबाखुमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शालेय परिसर तंबाखुमुक्त उपक्रमामध्ये मोलाची कामगिरी करणा-या सर्व अधिकारी/अंमलदार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देवुन गौरवण्यात आले आहे.
यापुढे देखील परिमंडळ-७ मधील शालेय परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची विक्री होत असेल तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ किंवा १०० नंबरला संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप आयुक्त, श्री. विजयकांत सागर यांनी केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…