मुंबई

Mumbai Police News : नवघर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण करून पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन

• Renovated Navghar Police Station and inaugurated by Police Commissioner Madhukar Pandey मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे लोकाभिमुख करून नागरिकांना अधिकाअधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.

भाईंदर :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे लोकाभिमुख करून नागरिकांना अधिकाअधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण करून नव्या वास्तूचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या बदलत्या कार्यशैलीची माहिती दिली.

राज्य सरकार‌ यांचा 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखडाचे अनुषंगाने, परिमंडळ-1 मधील, नवघर पोलीस ठाणेतील मुद्देमाल कक्ष, क्राईम कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, महीला कक्ष, रायटर कक्ष, हिरकणी कक्ष, महीला कक्ष, अभ्यांगत कक्ष, एटीसी कक्ष, अर्ज शाखा व तपास पथक कक्ष इत्यादी कक्षाचे कामकाज व सुशोभीकरण प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-1 यांच्या मार्गदशर्नाखाली करण्यात आलेले आहे. त्याचे उद्घाटन मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कशाप्रकारे पोलीस ठाण्यात सुविधा करण्यात आल्या आहे

1.नवघर पोलीस ठाण्याचे इमारतीचे व पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष, क्राईम कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, महीला कक्ष, रायटर कक्ष, हिरकणी कक्ष, महीला कक्ष, अभ्यांगत कक्ष, एटीसी कक्ष, अर्ज शाखा व तपास पथक कक्ष असे कक्षांचे नुतनीकरण, परिसराची साई सफाई व सुशोभीकरण करण्यात आले.

2.नागरीकांना बसण्याची व्यवस्था व सुसज्ज प्रतिक्षागृह तयार केले.

3.पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस ठाण्यात कामाचे निमित्ताने येणारे नागरीकांना पिण्यासाठी 24 तास स्वच्छ पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.

4.गुन्हयातील 29 लाख 26 हजार 242 रुपये किंमतीचा जप्त गुटखा माल कोर्टाची परवानगी घेवन नियमाप्रमाणे नाश करण्यात आला आहे.

5.बेवारस मोटार सायकलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून मुल्यांकन करुन घेण्यात आलेले असून त्याची पुढील लिलाच प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे.

6.पोलीस ठाणेकडील कायलबाहय अभीलेख नियमाप्रमाणे विक्री करून मिळालेले 5 हजार 600 रुपये रक्कम सरकार जमा केली आहे.

7.विविध गुन्हयातील जप्त वाहने 25 लाख 95 हजार विविध गुन्हयातील सोन्याचे दागीने 7 लाख 15 हजार 599 रु. चा मुद्देमाल मालकास परत केला आहे.

8.पोलीस ठाणे सेवा मुल्यांकन करण्याकरीता दर्शनी भागावर स्कॅनर लावण्यात आला आहे.

9.पोलीस ठाण्याचे हद्दीतील शाळा, कॉलेजमधील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच कॉम्पलेक्स, सोसायटी रहिवाशी मिटींग घेवून सायबर विषयक गुन्हे, महिला अत्याचार विषयक गुन्हे, डायल-112, नवीन कायद्यांबाबत माहिती देवून जन-जागृती करण्यात आलेली आहे.

11.विविध कंपनीमधील काम करणारे पुरुष व महीला कर्मचारी याची मिटींग घेऊन महिलांविषयी कायदे, सायबर गुन्हे, पोलीस हेल्पलाईन नंबर, बडी कॉप, दामीनी पथक, बी.एन.एस. व बी.एन.एस.एस या नवीन कायद्यांबाबत माहिती देवून जन-जागृती करण्यात आलेली आहे.

12.आग आपत्तीचे संदर्भात पोलीस अधिकारी/अंमलदार यांना तज्ञ तसेच मिरा-भाईंदर महानगर पालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत मुलभुत प्रशीक्षण घेवुन पोलीस ठाणे इमारत/आवारात अग्निशामक यंत्र बसविण्यात आले आहेत.

13.पोलीस अधिकारी/अंमलदार/मसूब यांचेकरीता “नागरीकांशी सौजन्याने वागावे” याकरीता व्याख्याते यांचेमार्फत शिबीर आयोजित करुन मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

14.पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंती नुतनीकरण करुन त्यांची रंग-रंगोटी करण्यात आलेली आहे.

15.पोलीस ठाण्याचे बाहेरील रोडवर सुशोभीकरण करून तक्रारदार व पोलीसांकरीता पाकींग सुविधा करण्यात आलेली आहे.

vivek

Recent Posts