Mumbai Police Latest Crime News : CEIR पोर्टलच्या मदतीने 19 जिल्ह्यांत 13 पथकांचा धाडसी शोध; आतापर्यंत 33 हजारांहून अधिक मोबाईल मालकांना परत
मुंबई | तुमचा मोबाईल मुंबईत चोरीला गेला किंवा हरवला असेल, तर तो आता पुन्हा मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक विशेष शोध मोहीम राबवून सुमारे 2 कोटी रुपये किमतीचे 1,650 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक परिमंडळातील ‘CEIR’ पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
19 जिल्ह्यांत शोध, 13 विशेष पथके रवाना
मुंबईतील चोरीच्या मोबाईलचा ‘CEIR’ पोर्टलवर आढावा घेतला असता, मोठ्या प्रमाणात मोबाईल उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय असल्याचे दिसून आले. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी 13 विशेष पथके तयार केली. या पथकांनी उत्तर प्रदेशातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शोध मोहीम राबवली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी हे सर्व 1650 मोबाईल संच जप्त केले आहेत.
आतापर्यंत 33 हजार मोबाईलची घरवापसी
मुंबई पोलिसांनी आजवर केलेल्या कारवाईत एकूण 33,514 चोरीचे किंवा हरवलेले मोबाईल संच हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. तंत्रज्ञानाचा आणि ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर केल्यामुळे हे यश मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, सह-पोलीस आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण चौधरी आणि सायबर गुन्हे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.
नागरिकांसाठी महत्त्वाची सुरक्षा नियमावली
मोबाईल चोरी किंवा फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना खालील आवाहन केले आहे.
त्वरित तक्रार: मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तत्काळ तक्रार करा.
मोबाईल ब्लॉक करा: गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल त्वरित ब्लॉक करा.
अनोळखी खरेदी टाळा: कोणाही अनोळखी व्यक्तीकडून जुना किंवा वापरलेला मोबाईल विकत घेऊ नका.
IMEI पडताळणी: जुना मोबाईल घेताना ‘Sanchar Sathi’ ॲप किंवा ‘KYM’ सुविधेद्वारे 14422 या नंबरवर SMS करून तो मोबाईल चोरीचा नाही ना, याची खात्री करा.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…