Mumbai Police Arrested Wanted Criminal: 20 ते 37 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना ठाणे, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथून अटक; न्यायालयीन वॉरंटनंतर मोठी कारवाई
मुंबई :- मुंबईतील परिमंडळ-04 अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘फरारी आरोपी शोध मोहीमे’ला मोठे यश मिळाले आहे. Mumbai Police Latest News या मोहिमेत काही दशकांपासून गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. Mumbai Police News
फरार आरोपी आणि त्यांच्या अटकेची कहाणी
37 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
भोईवाडा पोलीस ठाणे येथे दिनांक 16/11 रोजी दादर येथील मिठवाला चाळीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि रोख रक्कम घेऊन पळून जाण्याच्या गुन्ह्यातील आरोपी नफीज अब्दुल अजिज शेख (वय 61) हा फरार होता. गुप्त माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेतला असता, तो पुणे येथील घोडेगाव येथे राहत असल्याचे आढळले. चौकशीनंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
20 वर्षांपासून फरार आरोपी ठाण्यात सापडला
र.अ. कि. मार्ग पोलीस ठाणे मध्ये 2005 मध्ये दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात (कलम 399, 4026भादंवि) आरोपी जावेद युसूफ शेख (वय 48 वर्षे) याला जामीन मिळाल्यानंतर तो सत्र न्यायालयात हजर राहत नव्हता. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. गोपनीय बातमीनुसार आरोपी ठाणे शहरामध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाल्यावर दि. 20/11 रोजी त्याला ठाणे शहरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
25 वर्षांपासून फरारीचा साताऱ्यात शोध
काळाचौकी पोलीस ठाणे मध्ये 1992 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी विलास गणपत घोरपडे हा मागील 25 वर्षांपासून न्यायालयाच्या तारखेस हजर राहत नव्हता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध स्थायी अटक वॉरंट जारी केले होते. आरोपी हा सातारा येथे भाड्याने राहत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावर दि. 18/11 रोजी त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
11 वर्षांपासून फरारी कोल्हापुरातून ताब्यात
काळाचौकी पोलीस ठाणे येथे 2014 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश अमृतलाल पासी हा तेव्हापासून फरार होता. त्याचा शोध त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशात घेण्यात आला, परंतु तो कोल्हापूर जिल्हयात गेला असल्याची माहिती मिळाल्यावर दि.26/11 रोजी त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती आणि पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…