Mumbai Mulund Police Busted Gutkha Racket : मुलुंड पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली; जप्त मुद्देमालात नामवंत कंपन्यांच्या सुगंधी सुपारी आणि गुटख्याचा समावेश
मुंबई | मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-7 Mumbai Unit 7 च्या पथकाने ऐरोली टोलनाका परिसरात मोठी कारवाई करत सुमारे 2 कोटी 1 लाख 30 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी सुपारीची छोट्या वाहनांमार्फत मुंबईत तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, ज्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. Mumbai Police Latest News
पहाटे 6 वाजता टाकली धाड
पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-7) हेमराजसिंह राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुलुंड पूर्व येथील जुना जकातनाकाच्या मोकळ्या जागेत या मालाची वाहतूक होणार होती. त्यानुसार 8 जानेवारी 2026 रोजी पहाटे 6 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील करांडे आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला. यावेळी तिथे उभ्या असलेल्या 3 आयशर ट्रक, 10 टेम्पो आणि एका कारसह एकूण 14 वाहनांची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला गुटखा मिळून आला.
असा आहे जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत 80 लाख 55 हजार 620 रुपये आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील मालाचा समावेश आहे:
प्रीमियम झाफ्रानी जर्दा (Premium ZN-01, ZN-02)
प्रीमियम कॅश गोल्ड फ्लेव्हर्ड पान मसाला
वाराणसी आशिक गुटखा
प्रीमियम राज निवास सुगंधित पान मसाला आणि SAK गुटखा
वाहने: 1 कोटी 20 लाख 75 हजार रुपये किमतीची एकूण 14 वाहने.
10 आरोपींना अटक
विक्रोळी पोलीस ठाण्यात Vikhroli Police गुन्हा दाखल याप्रकरणी पोलिसांनी आदिल अबुबकर शेख (वय 37) आणि सिराज उनउल्लहक सिदकी (वय 30) यांच्यासह एकूण 10 जणांना अटक केली आहे. या आरोपींविरुद्ध विक्रोळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यांनी केली कामगिरी ही मोहीम पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी, आणि अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुलुंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील करांडे, योगेश पाटील, मनोज पाटील आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…