क्राईम न्यूज

Mumbai Police News : अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम

Mumbai Police special campaign against drugs : मुंबई पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत 11 अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल, 15 आरोपींना अटक

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबई शहरात आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाकाबंदी, चेकिंग, व्हिडिओग्राफी चेकिंग यांसारख्या कारवाया पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती Mumbai Police special campaign या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मुंबईत 24 तासात तब्बल 11 अंमली पदार्थाचे गुन्हे नोंदवण्यात आले असून पंधरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 321 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची तपासणी केली आहे. Mumbai Police special campaign against drugs

मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कार्यवाही करण्याकरीता पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar , विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे सूचनेनुसार, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदीन विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुंबई शहरातील पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार हे एकत्रित मुंबई शहरात कार्यवाही करीत आहेत.अंमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व व्यापार प्रतिबंध करुन अंमली पदार्थ मुक्त मोहिम राबविली आहे. Mumbai Police special campaign against drugs

मोहिमेअंतर्गत मागील 24 तासांमध्ये आग्रीपाडा, नेहरूनगर, शिवाजीनगर, घाटकोपर, खेरवाडी,डी.एन. नगर, अंबोली, एम.आय.डी.सी, बांगुरनगर, बोरीवली व कस्तुरबा पोलीस ठाणे अंतर्गत अंमलीपदार्थ कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई दरम्यान बोरीवली पोलीस ठाणे अंतर्गत 61 ग्रॅम Heroin हा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत एमडी अंमली पदार्थ विरोधात 1, गांजा 7,Heroin 1,Codeine Phosphate & Triprolidine Hydrochloride Syrup ONEREX 2 असे एकूण 11 गुन्हे दाखल असून आत्तापर्यंत 13 आरोपींना अटक केली आहे. तसेच 321 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची फेर तपासणी पोलिसांनी या विशेष मोहिमेच्या अंतर्गत केली आहे. Mumbai Police special campaign against drugs

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago