क्राईम न्यूज

Mumbai Police News : मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर! काळाचौकीतील ‘बतावणी’ चोरी उघड; 162 गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीतील मुख्य आरोपीला अकोल्यातून अटक

Mumbai Police Arrested Robbers : पोलिसांनी 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले; तांत्रिक तपासातून आरोपीची ओळख पटली,अकोला येथील इराणी वस्तीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक; आरोपी ‘सज्जाद इराणी’ अभिलेखावरील गुन्हेगार

मुंबई :- मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाणे Mumbai Kalachowki Police Station हद्दीत एका 77 वर्षीय वृद्धेची ‘बतावणी’ करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या इराणी टोळीतील मुख्य आणि सराईत आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अटकेतील आरोपी सज्जाद गरीबशहा इराणी उर्फ पठाण याच्यावर यापूर्वीच मुंबई आणि राज्यात मिळून एकूण 162 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. Mumbai Police Latest Crime News

नेमका गुन्हा काय घडला?

05 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळीच्या सुमारास फिर्यादी श्रीमती सुमित्रा रामकृष्ण सांपरग (वय 77) यांना दोन अनोळखी इसमांनी गाठले. त्यांनी फिर्यादींना, ‘पुढे पोलीस चोर पकडत आहेत, तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने कापडी पिशवीत ठेवा,’ असे सांगून त्यांची दिशाभूल केली. फिर्यादीच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची माळ पिशवीत ठेवण्याचे नाटक करून हातचलाखीने आरोपींनी ते दागिने चोरून नेले. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला होता. Mumbai Police Latest Robbery News

पोलिसांची तपासणी आणि अटक

गुन्हा घडल्यापासून आरोपींचा शोध घेण्यासाठी काळाचौकी पोलिसांनी गुन्हेगारांचा मागोवा घेणारी आणि तांत्रिक तपास करणारी वेगवेगळी पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील आणि इतर ठिकाणचे तब्बल 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासानंतर आरोपी हा अभिलेखावरील सज्जाद गरीबशहा इराणी उर्फ पठाण (वय 46) असल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलिसांनी तात्काळ गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली आणि स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा अकोला यांच्या मदतीने अकोला येथील इराणी वस्तीत सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. Mumbai Police Latest News

पोलीस दलाचे कौतुक

बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विकम देशमाने, पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. Mumbai Police News

vivek

Recent Posts