Mumbai Police News: मुंबई पोलिसांनी काही तासांत शोधून काढले परदेशी नागरिकाचे जॅकेट ; जॅकेट मध्ये पासपोर्ट, रोख रक्कम आणि मोबाईल फोनचा समावेश
Mumbai Police News: परदेशी नागरिकांनी मुंबई पोलीस यांना पत्र लिहून मानले आभार!
मुंबई :- राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाकरीता पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातील व्हीआयपी चे प्रचार सभेमुळे पोलीस व्यस्त असतांनाही पोलीस दलातून एक कौतुकास्पद बाब समोर आली आहे. बेल्जियम देशात राहणारे एका परदेशी नागरिकाचे हरविलेले जॅकेट पोलीसांनी Mumbai Police क्षणार्धात शोधून काढले आहे.या परदेशी नागरिकांनी पत्राद्वारे मुंबई पोलिसांचे Belgium Tourist Thanks Mumbai Police आभार व्यक्त करत धन्यवाद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(14 नोव्हेंबर) रोजी काळाचौकी पोलीस ठाणे हददीत रात्रपाळी कर्तव्य करीत असताना मध्यरात्रीच्या दरम्यान बेल्जियम या देशाचे नागरिक विल्यम जुमेट हे मुंबई एअरपोर्ट वरून ते सद्या राहत असलेल्या हॉटलकडे येत असताना त्यांच्याजवळील ब्लॅक कलरचा कोट, त्यात त्यांचे पासपोर्ट, ओपो कंपनीचा मोबाईल फोन, तसेच त्यांच्याकडे त्यांच्या देशाचे व भारतीय चलनाची अंदाजे 50 हजार रुपये ब्लॅक कोटमधे ते कुठेतरी विसरल्यामुळे त्यांना मिळून येत नसल्याने पोलीस ठाणेस तक्रार देणे कामी आले.
काळाचौकी पोलिस स्टेशन येथे रात्रपाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असलेले महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी इंगळे यांनी बेल्जियम या देशाचे नागरिक असलेल्या विल्यम जुमेट यांचे तक्रारीची तात्काळ दखल घेतली. विल्यम जुमेट यांच्या हरवलेल्या वस्तु व रक्कमचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलाणी व पथकाच्या मदतीने क्षणाचाही विलंब न करता विल्यम जूमेट यांच्या हस्वलेल्या वस्तुंचा शोध सुरू केला. त्यांनी केलेल्या प्रवासाची सविस्तर माहिती घेऊन विल्यम जुमेट यांनी प्रवासाकरीता वापरलेल्या टॅक्सीचा एअर पोर्ट परीसरात तसेच त्यांच्या प्रवासाचा मार्गावर शोध घेतला. टॅक्सी क्रमांक प्राप्त करून टॅक्सी चालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून अतिशय कमी कालावधीत तक्रारदार यांचे प्रवासात हरवलेले सर्व वस्तु व रक्कम महिला पोलीस उपनिरीक्षक. इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलानी व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी उत्कष्टपणे तपास करून तक्रारदार यांना तात्काळ मिळवून दिले.
त्याबाबत बेल्जियम देशाचे नागरिक विल्यम ज्युमेट यांनी ड्यूटी ऑफिसर महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी इंगळे, पर्यवेक्षक तानाजी कुंभार तसेच त्यांना सदर तपासाकरिता मदत करणारे अंमलदार व संपूर्ण मुंबई पोलिस दलाचे आभार मानले आहे.