Mumbai Police Destroys Drug Bottle : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या 59 गुन्ह्यांतील अंमली पदार्थांवर पनवेलजवळील तळोजा येथे बंदिस्त भट्टीत कारवाई
मुंबई :- अंमली पदार्थ मुक्त समाज बनवण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई पोलीस दलाने Mumbai Police आज (16 ऑक्टोबर 2025) मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, Mumbai Narcotics And Crime Branch मुंबई अंतर्गत दाखल 59 गुन्ह्यांतील जप्त केलेला तब्बल 162 किलोग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आणि 7908 कोडिन मिश्रित बाटल्या नष्ट करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या या अंमली पदार्थांची अंदाजित किंमत 80.56 कोटी इतकी आहे.हा सर्व अंमली पदार्थ महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, एमआयडीसी तळोजा, (ता. पनवेल, जि. रायगड) येथील बंदिस्त भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला. Mumbi latest Drug News
नष्ट केलेल्या पदार्थांचा तपशील
जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये खालील बाबींचा समावेश होता:
144.318 किलो गांजा
8.216 किलो चरस
6.048 किलो कोकेन
2.197 किलो एम.डी.
1.679 किलो हेरॉईन
7908 कोडिन मिश्रित बाटल्या
वर्षभरातील दुसरी मोठी कारवाई:
सध्याची कारवाई सन 2025 मधील दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी मे 2025 मध्ये पोलिसांनी 530 किलो वजनाचा अंमली पदार्थ आणि 4433 कोडिन मिश्रित बाटल्या (किंमत 50.30 कोटी) नष्ट केल्या होत्या.
या दोनही कारवाईमध्ये मिळून बृहन्मुंबई पोलिसांनी सन 2025 मध्ये एकूण 692 किलोग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आणि 12,341 कोडिन मिश्रित बाटल्या असा, एकूण 130 कोटी 86 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ नष्ट केला आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि सह आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण यांच्या सहकार्याने ही यशस्वी प्रक्रिया पार पडली. यावेळी घटक स्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीचे सदस्य तसेच रासायनिक तज्ञ आणि न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अधिकारी उपस्थित होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…