Mumbai Crime News : 21 वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस पुन्हा अटक
Mumbai Police Arrested Criminal : 2003 च्या कलम 379 गुन्ह्यातील आरोपी तब्बल 21 वर्ष फरार होता, पायधुनी पोलिसांनी आरोपीला केले अटक
मुंबई :- 2003 न्यायालयीन प्रक्रियेतील कलम 379 मधला आरोपी पोलिसांनी 25 वर्षानंतर फरार असलेले आरोपीला अटक केली आहे.
पायधुनी पोलिस ठाणे कलम 379,34 भादवि, न्यायालयातील सन 2003 या गुन्हयाची नियमित सुनावणी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, २ रे न्यायालय, मांझगाव, मुंबई यांच्या न्यायालयात चालू आहे. नोंद गुन्हयातील आरोपी नामे रौफ उर्फ बबलु शेख, (52 वर्षे) हा सदर गुन्हयाच्या सुनावणीकामी मा. न्यायालयात वारंवार गैरहजर रहात असल्याने त्यास न्यायालयाने फरारी घोषित केले होते व तेव्हापासुन आरोपी फरार Tadipar Criminal होता व तो मिळून येत नव्हता. Mumbai Crime News
फरार आरोपी पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाळ व पथक यांनी गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रीक तपास करुन आरोपी हा गोकुळधाम (सोसायटी, सेक्टर, ३५ डी, खारघर,) नवी मुंबई या ठिकाणी राहण्यास असल्याचे शोधुन काढले. पथकाने ठिकाणी सापळा रचुन फरारी आरोपीला मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले,पायधुनी पोलीस ठाणेस आणुन अटक करण्यात आली. आरोपी या गुन्हयाबरोबर इतर गुन्हयातही फरारी असुन विविध पोलीस ठाणेमधील पोलीस पथके त्याचा शोध घेत होती, विविध न्यायालयांनी त्याचेविरुध्द अजामीनपात्र वॉरट काढलेली होती. Mumbai Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -2 डॉ मोहितकुमार गर्ग,सहाय्यक पोलीस आयुक्त पायधुनी विभाग ज्योत्सना रासम, पायधुनी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बाळकृष्ण देशमुख , पोलीस निरीक्षक नितीन पगार (गुन्हे) यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिल वायाळ, पोलीस हवालदार कैलास भोईटे, इरफान खान, दिपक निकम, प्रमोद कदम, प्रविण चौधरी, पोलीस अंमलदार शंकर राठोड, नितेश घोडे, प्रकाश अलदर ,विलास पाडवी यांनी केली आहे. Mumbai Crime News