मुंबई

Mumbai Police News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठरला एक नंबर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रिपोर्ट कार्ड मध्ये मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्ताचा पहिला नंबर

मिरा रोड :– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याने प्रशासनातील सर्व विभागाचा रिपोर्ट कार्ड सादर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रिपोर्ट कार्ड मध्ये मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय ते एक क्रमांकाचे पोलीस आयुक्तालय ठरल्याचे सांगण्यात आले आहे. Quality control of India यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर आयुक्तालयाला एक नंबर देण्यात आला आहे. सर्वात उत्कृष्ट कामगिरी करून मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयास 100 पैकी 84.57 गुण प्राप्त झाले आहे.

गुणांकन पद्धत खालील मुद्यांवर आधारीत असून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयाने खालील प्रमाणे कामगिरी केलेली आहे.

1.संकेतस्थळ- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयाचे संकेतस्थळ अद्ययावत आणि नागरीकांना वापरण्यास सुलभ, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत आयुक्तालयाच्या माहितीचे स्वयंप्रकटीकरण, पर्यावरणपुरक प्रमाणित व लोक सेवा अधिनियमातंर्गत सेवा अधिसूचित करून प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत. आयुक्तालायाची वेबसाईट ही (CERTIn) यांचे मार्फतीने सायबर ऑडीट केलेली आहे.

2.सुकर जीवनमान – 1.पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ -1 मधील सर्व पोलीस ठाणे व कार्यालये यांना ISO, SMART प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यात आले आहे. 2.आयुक्तालयाने नागरीकांमध्ये जनजागृती विषयी माहिती व अलर्ट मेसेज तात्काळ पोहचविण्यासाठी व्हॉट्सऱ्यॲप चॅनल सुरु करण्यात आलेले असून त्याला ब्लू टीक प्राप्त आहे. 3.बालकांचे हक्क व बालकांचे संरक्षण याबाबत जनजागृती करणे. बाल हक्कांचे संरक्षण करणे यासाठी युनिसेफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “बाल रक्षा” अभियान सुरु करण्यात आले आहे. 4.नागरिकांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक व सोशल मिडीया संदर्भात जनजागृती करण्याकरीता व तक्रार देण्याकरीता मार्गदर्शक व उपयुक्त माहितीचे 24 तास सतत सादरीकरण करणारी स्क्रीन सर्व पोलीस ठाणे व कार्यालये येथे लावण्यात आले आहेत.

3.खच्छता आयुक्तालयामध्ये पोलीस ठाणे व कार्यालयामध्ये असलेले मुदतबाह्य अभिलेख, बेवारस व जुनी वाहने यांची कायदेशिर विल्हेवाट लावून कार्यालयांचा परिसर मोकळा स्वच्छ केलेला असून तिथे फुलझाडे व कुंड्या लावून सुशोभिकरण केलेले आहे.

4.कार्यालयीन सोयीसुविधा 1 पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाणे, सर्व कार्यालयांमध्ये येणा-या तक्रारदार नागरीकांची तक्रार दाखल करेपर्यंत गैरसोय न व्हावी या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या. उदा. नागरीकांसाठी स्वच्छ पिणाच्या पाण्याची सोय, व्यवस्थित प्रसाधनगृहे त्यांच्यासाठी चांगल्याप्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 2. नामफलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. 3.प्रत्येक पोलीस ठाण्याला आवश्यक असलेले संगणक व प्रिंटर नव्याने वाटप करण्यात आले. 4.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग, भरोसा सेल, वाहतूक शाखा विरार, गुन्हे शाखा युनिट 3, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा, वसई, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वसई-विरार अशी कार्यालये नवीन व अद्यावत तयार करण्यात आलेली आहेत. 5. वर्क फोर्स ॲपद्वारे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची सेवाविषयक संपूर्ण माहिती एकत्रित करण्यात आलेली आहे. 6.07 वर्षावरील शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळावरुन फॉरेन्सिक दुवे गोळा करण्यासाठी आय बाईक (Investigation Bike) फॉरेन्सिकच्या ३ टीम स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

5.ई-ऑफीस व ई-बीट प्रणाली- 1.आयुक्तालयातील सर्व कार्यालयांमध्ये 100 टक्के ई-ऑफिस कार्यप्रणालीचा वापर करण्यात येत आहे.2 आयुक्तालयामध्ये स्मार्ट ई-बीट हे मोबाईल ॲपलीकेशन सर्व पोलीस ठाण्यांतील बीटमार्शल यांनी एखाद्या ठिकाणी दिलेली भेट व वेळ याबाबत पर्यवेक्षण करण्याकरीता सुरु करण्यात आलेले आहे.

6.आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन आयुक्तालयामध्ये आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्याकरीता पोलीस विभागामार्फत पोलीस आयुक्त पासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्तरापर्यंत 26 बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये उदयोजकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण व गुंतवणुकीस पुरक वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे.

7.नाविण्यपूर्ण उपक्रम 1.कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) च्या माध्यमाने आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरांचा वापर करुन वाहतूक नियमभंग करणा-यांसाठी चलान करण्यात येत आहेत. 2.बॉडी वॉन कॅमेरा वाहतूक पोलीसांच्या कार्यक्षमतेत गुणात्मक व पारदर्शी सुधारणा होण्यासाठी वाहतूक अंमलदारांना कर्तव्यावर असताना बॉडी वॉर्न कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. 3.पोलीस ठाण्यांमध्ये येणा-या नागरीकांना त्यांना आलेला अनुभव नोंदविण्याकरीता ई-अभिप्राय सेवा (QR Code Base) सुरु करण्यात आली असून त्यामध्ये नागरीक सुलभरीत्या त्यांचा अभिप्राय नोंदविता येतो व त्यावर वरिष्ठ अधिकारी दखरेख करतात.

मधुकर पाण्डेय व अपर पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 प्रकाश गायकवाड,पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -3,जयंत बजबळे तसेच आयुक्तालयातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली कामगिरी केल्याने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयास राज्यातील पोलीस आयुक्तालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0