Mumbai Police News : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उद्या (26 जून) अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करणार.
•पोलिसांकडून महाविद्यालय विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धेचे आयोजन
मिरा रोड :- उद्या (26 जून) जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी निमित्त मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महाविद्यालयान विद्यार्थ्यां करिता विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे.
एल आर तिवारी कॉलेज मीरा रोड येथे दुपारी बारा वाजता पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार यांच्या हस्ते कार्यक्रमाला शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमाला पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ-1 परिमंडळ-2 आणि परिमंडळ-3 यांच्या हद्दीतील सर्व महाविद्यालय सहभागी होणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणाई मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सेवनाच्या अधीन गेली आहे. त्यामुळे अनेक अपराध आणि गुन्हे होत असतात याबाबतच्या घटना सातत्याने आपल्या परिसरात आढळून येतात.या पार्श्वभूमीवर समाजामध्ये आणि तरुण वर्गामध्ये परिवर्तन करण्याकरिता अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त पोलीस आयुक्तांकडून अंमली पदार्थ बाबत जागृती करण्याकरिता एक उपक्रम हाती घेतला आहे.यामध्ये मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीतील महाविद्यालय सहभागी होणार आहे.