Mumbai Police News : गुम झालेले 52 लाखांचे मोबाईल आणि 1 कोटींचा मुद्देमाल परत; पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद!
Mumbai Police Latest News : पूर्व उपनगरांतील 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा तपास, मूळ मालकांना परत मिळाला ऐवज
मुंबई :- उपनगरांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीला गेलेले दागिने, रोकड आणि हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. Mumbai Mobile Robbery परिमंडळ-7 Mumbai Police Unit 7 च्या पोलिसांनी केलेल्या यशस्वी तपासामुळे सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. Mumbai Police Latest News
सोमवारी मुलुंड येथील एम.सी.सी. महाविद्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्या हस्ते नागरिकांना हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. गेल्या वर्षभरात परिमंडळ ७ अंतर्गत येणाऱ्या घाटकोपर, विक्रोळी, पार्क साईट, कांजूरमार्ग, नवघर, मुलुंड आणि भांडुप या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक चोरीचे आणि हरवलेल्या वस्तूंचे गुन्हे दाखल झाले होते.
या गंभीर प्रकरणांची दखल घेत परिमंडळ-7 चे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी एक विशेष तपास पथक तयार केले होते. या पथकाने विविध राज्यांमध्ये जाऊन आरोपींचा शोध घेतला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल झाली.
या तपास मोहिमेनंतर पोलिसांनी परत केलेला मुद्देमाल हा मोठा आहे. यामध्ये सुमारे 52 लाख रुपये किमतीचे 359 हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन, तसेच 36 वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर वस्तू असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
यावेळी, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांनी नागरिकांना मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि रोकड यांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, पोलिसांना मिळालेल्या या यशामुळे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांची वाढलेली कार्यक्षमता दिसून येते. या कामगिरीमुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे.


