Mumbai Police News : लोकमान्य टिळक पोलीस ठाणे. आणि वि. प. मार्ग पोलीस ठाणे यांची उत्कृष्ट कामगिरी! गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण 100%, सामाजिक कामातही आघाडी

Mumbai Police Latest News : परिमंडळ-2 अंतर्गत GRASP तथा ‘Grievance Redressal And Assessment of Services By Police’ ही कामगिरी मुल्यमापन प्रणाली राबवून पोलीस ठाण्यास चांगली कामगिरी करणा-या अधिकारी अंमलदार यांना प्रोत्साहन
मुंबई :- GRASP तथा ‘Grievance Redressal And Assessment of Services By Police’ ही मुल्यांकन प्रणाली परिमंडळ-2 अंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे.फेब्रुवारी 2025 मधील पोलीस ठाणेंनी केलेल्या एकंदरीत कामगिरीचा आढावा घेण्यात आला असुन सर्व उत्कृष्ठ कामगिरी करून सर्वाधिक गुण प्राप्त करून लोकमान्य टिळक पोलीस ठाणे Mumbai Lokmanya Tilak Police Station यांनी प्रथम क्रमांक पटकावला व वि. प. मार्ग पोलीस ठाणे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. Mumbai Police Latest News
पोलीस ठाण्यामधील अधिकारी व अंमलदार हे त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आणणे, क्लिस्ट गुन्हयांचा तपास करणे जलद गतीने निर्गती करणे, आरोपी अटक करून ॲम्बिस प्रणालीमध्ये नोंद करणे, अर्ज निर्गती, पासपोर्ट / चारित्र्य पडताळणी, बांग्लादेशी कारवाई, अंमलीपदार्थ विरोधी कारवाई, ऑकेस्ट्रा बार कारवाई, प्रतिबंधक कारवाई, हॉकर्स कारवाई, मुद्देमाल निर्गती, मॉक ड्रील अशा अनेक शिर्षकाखाली केलेल्या चांगल्या कामगिरीला प्रोत्साहन देणे असा आहे.










कशाप्रकारे पोलिसांनी कामगिरी केली आहे
1.गुन्हे निर्गती, गुन्हे प्रकटीकरण व गुन्हे दोषसिद्धी या शिर्षकाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), वि. प. मार्ग पोलीस ठाणे,
2.मुद्देमाल (भादवि व किंमती मुद्देमाल) निर्गती या शिर्षकान्वये पोलीस निरीक्षक (प्रशासन) वि. प. मार्ग पोलीस ठाणे,
3.प्रलंबित तक्रार अर्जाची निर्गती करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक (जनसंपर्क) लो टी मार्ग पोलीस ठाणे,
4.अवैध बांग्लादेशी कारवाई व अंमलीपदार्थ विरोधी कारवाई या शिर्षकान्वये कारवाई केलेल्या पोलीस निरीक्षक (का. व सु.) डॉ दा भ मार्ग पोलीस ठाणे,
5.गुन्हयांचा जलद गतीने व उत्कृष्ट तपास करून गुन्हेगारांना अटक करून 100 टक्के मुद्देमाल हस्तगत केला या करीता गुन्हे प्रकटीकरण अधिकारी डॉ. दा. भ. मार्ग व पायधुनी पोलीस ठाणे,
6.भारतात अवैधरित्या वास्तव्यास असणा-या एकुण 23 बांग्लादेशी घुसखोर नागरीकांचा शोध घेवुन अटकेची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यांचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी
7.सराईत गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासुन प्रतिबंध करण्याकरीता त्यांना म.पो. का अन्वये तडीपार करणे तसेच त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्याबाबत लो. टी. मार्ग व मलबार हिल पोलीस ठाण्यांचे प्रतिबंधक अधिकारी,
8.सायबर गुन्हयांचा उत्कृष्ठ तपास करून उल्लेखनिय कामगिरी करणा-या गांवदेवी, डॉ दा भमार्ग पोलीस ठाणे तसेच परिमंडळ2 सायबर लॅबचे सायबर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी.
डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या हस्ते वरील सर्व अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाकरीता पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, मुंबई तसेच परिमंडळ-2 अंतर्गत विभागीय सहायक पोलीस आयुक्त, व सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.


