Mumbai Police News : पोलीस स्थापना दिन सप्ताह याचे अनुषंगाने ; 1 कोटी 71 लाख किंमतीचा मुद्देमाल दिला मूळमालकांना परत
Mumbai Police Latest News : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-5 पोलिसांनी गुन्ह्यांचा छडा लावत चोरी गेलेला 1 कोटी 71 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकास परत केला.
मुंबई :- मुंबई पोलिसाच्या परिमंडळ-5 Mumbai Police Unit 05 हद्दीतील दादर, शिवाजी पार्क, माहीम, शाहूनगर,धारावी,कुर्ला वि.भा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील मोबाईल चोरी, मोटार वाहन चोरी, इतर गुन्हे,गाहाळ व मुद्देमाल CEIR पोर्टल तसेच गोपनीय व तांत्रिक मुद्द्याच्या आधारे नागरिकांना परत मिळवून दिला आहे. यांना 398 तोळे सोने-चांदीचे दागिने ,167 मोबाईल आणि लॅपटॉप, 22 मोटर वाहने, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेल्या एकूण 1 कोटी 71 लाख 72 हजार 774 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून रेझिंग डे निमित्त गणेश गावडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-5 यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आला.
उपस्थित तक्रारदार निधी सिंघानिया यांनी मुंबई पोलीसांचे आभार व्यक्त केले तसेच मुंबई पोलीसांमुळे ते पर राज्यातील असून देखील त्यांना मुंबई सारख्या शहरात सुरक्षित वाटत असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच तक्रारदार सुरेश बाबु लोकरे यांनी मुंबई पोलीसांनी त्यांच्या घरी घडलेल्या घरफोडीचा गुन्हा 08 दिवसात पोलीसांनी अथक परिश्रम घेवून उघडकीस आणल्याबाबत पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच माहिम पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार अनिवासी भारतीय महिला सिमी कटारिया (57 वय) यांनी मुंबई पोलीस दलाची कामगिरी ही स्कॉटलंड यार्ड किंवा अमेरिकन पोलीस यांच्यापेक्षाही प्रभावशाली असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे.कार्यक्रमादरम्यान हे सर्व साहित्य संबधित फिर्यादी मूळ मालक असलेल्या नागरिकांना परत देण्यात आले. चोरीस गेलेला माल पुन्हा नागरिकांना परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
परिमंडळ-5, मुंबई अंतर्गत सर्व पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस उप आयुक्त गणेश गावडे, परिमंडळ-5, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे कुर्ला विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण भोर माहिम विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण तेजाळे दादर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क, माहिम, शाहु नगर, धारावी, कुर्ला, वि.भा. नगर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी विविध इसमांकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे .