Mumbai Police Latest News : गुन्हेगारीचे स्वरूप बदलेल; कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षेवर मुंबई पोलिसांचा भर
मुंबई :- 2047 पर्यंत मुंबईची लोकसंख्या दुप्पट होणार असून, भविष्यातील गुन्हेगारीचे बदलते आणि कल्पनेपलीकडील स्वरूप पाहता, मुंबई पोलिसांच्या हाती पारंपरिक काठी नव्हे, तर टॅबलेट द्यावा लागेल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी केले. लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘व्हिजन मुंबई 2047’ या कार्यक्रमात ते बोलत होते. Mumbai Police News
गुन्हेगारांच्या पुढील स्तराचा विचार
पोलीस आयुक्त भारती यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या व्हिजन पत्रातही ड्युटीवर असलेला पोलीस टॅबलेटवरच गुन्हा दाखल करील, अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. भविष्यातील गुन्हेगारीचा विचार करताना त्यांनी काही ‘कल्पनेपलीकडील’ धोक्यांकडे लक्ष वेधले: Mumbai Latest Crime News
“येत्या काळात एखादे ड्रोन येऊन सोनसाखळी चोरीची नोंद होईल.”
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अनैतिक वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यातील गुन्हेगारी या पातळीवर जाईल, या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत आहोत.
दहशतवादी हल्ले: अमेरिकेतील 9/11 आणि मुंबईतील 26/11 हल्ले जसे कल्पनेपलीकडचे होते, तसेच भविष्यात कुठले कल्पनेपलीकडील दहशतवादी हल्ले असू शकतात, यावरही विचारमंथन सुरू आहे.
सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फटका
सायबर गुन्हेगारीत वाढ होत असली तरी, या गुन्ह्यांमध्ये बसणारा मोठा आर्थिक फटका कसा कमी करता येईल, यावर भर दिला जात आहे. भारती यांनी नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली:
“गुन्हा घडल्यावर पहिल्या पाच मिनिटांत 1930 या क्रमांकावर माहिती दिल्यास गेलेली संपूर्ण रक्कम परत मिळू शकते.”
आतापर्यंत मुंबई पोलिसांनी सायबर गुन्ह्यांमधील फसवणुकीची 450 कोटी रुपये रक्कम परत मिळवली आहे.
सध्या फसवणुकीची रक्कम अनेक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाते, पण भविष्यात बॅंकेतील संपूर्ण रक्कम गायब करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाऊ शकते, हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही सुसज्ज होत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाढता जातीय तणाव आणि वाहतुकीचा ताण
सामाजिक स्तरावर होत असलेल्या बदलांवर बोलताना भारती म्हणाले की, आज जात आणि धर्मावर आधारित गटबाजी वाढल्याने जातीय तणाव वेगळी पातळी गाठू शकतो. त्यामुळे पोलिसांना आपली पारंपरिक पद्धत निश्चितच बदलावी लागणार आहे. तसेच, मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत वाढ झाल्याने पोलिसांवर सुरक्षेचा ताण पडणार आहे. अशावेळी वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…