मुंबई

Mumbai Police News : देवेन भारतींची ‘सुपर 10’ टीम पुन्हा मुंबईत! गुन्हेगारीविरोधात मुंबई पोलिसांची रणनीती सज्ज

•गुन्हे शाखेतील कसलेल्या 10 एसीपींचं पुनरागमन, मुंबईतील गुन्हेगारीला दणका देण्याची तयारी

मुंबई :- मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर वचक ठेवणारी, तपासात तरबेज अशी ‘क्राईम फोर्स’ पुन्हा मुंबईत दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, या दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांनी (एसीपी) याआधीही गुन्हे शाखेत ठसा उमटवलेला आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या ‘स्पेशल टीम’चा भाग असलेले हे अधिकारी आता पुन्हा मुंबई पोलिस दलात सक्रिय होणार आहेत.

या यादीत संजय डहाके, महेश मुगुटराव, अविनाश पालवे, ज्योत्स्ना रासम, सूर्यकांत बांगर, कल्पना गाडेकर, मृत्युंजय हिरेमठ, रेणका बुवा, शशिकांत माने आणि सुहास कांबळे यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या खटल्यांचा यशस्वी तपास केला असून त्यांचा अनुभव मुंबई पोलिस दलासाठी मोठी ताकद ठरणार आहे.

दरम्यान, सध्या मुंबईत कार्यरत एसीपी मनोज खंडाळे यांची बदली नाशिकच्या गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. हे सर्व बदल्यांचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी अधिकृतपणे काढले.

महत्वाचं म्हणजे, गेल्या आठवड्यात राज्यातील 500 पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांमुळे पोलिस खात्यात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. निवडणुकीदरम्यान बाहेर गेलेले हे अधिकारी पुन्हा मैदानात उतरले असून, गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला नवी धार मिळणार हे निश्चित!

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago