क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police News : मौजमस्ती करण्यासाठी सराईत आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या

Mumbai Police Arrested Minor Boys For Vehicle Stolen : पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यामध्ये अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीत त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली असता, त्यामधील 6 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या.

मुंबई :- मुंबईतून दुचाकी वाहनांची चोरी Vehicle Stolen करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून 6 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दोन गुन्हेगाराना पकडण्यात आले असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा सहभाग आहे. Mumbai Police पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 5 गुन्हे उघड केले आहे. Mumbai Police Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार र.अ.कि. मार्ग पोलीस ठाणे दिनांक 16 ऑक्टोबर रोजी तक्रार प्राप्त झाली की, तक्रारदार यांची होंडा ॲक्टिवा मोटरसायकल 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास सुमारास शांताराम बिल्डींग समोरील फुटपाथ, कात्रक रोड, वडाळा, येथे पार्क केली होती. त्यानंतर दिनांक 16 ऑक्टोबर सकाळच्या दरम्यान पाहिली असता ती दिसुन आली नाही. म्हणुन ते पोलीस ठाणेस तक्रार देण्याकरिता आले, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन र.अ.कि. मार्ग पोलीस ठाणे कलम 303(2) भा.न्या. सं 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Mumbai Police Latest Crime News

आरोपींना वाशी नाका चेंबुर येथुन अटक

गुन्हा नोंद करताब र.अ. कि. मार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे, पोलीस निरीक्षक सलीम नदाफ (गुन्हे) यांनी गुन्हे प्रकटीकरण पथ्यास तपासाबाबत सुचना दिल्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते व पथकाने तपास सुरु केला. तपासदरम्यान ठिकाणाचे सीसीटिव्ही तपासले असता दोन संशयीत व्यक्ती यांनी गाडी चोरी केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार पोटे व पथक यांनी वडाळा, ॲन्टॉपहिल, वडाळा टी टी, नेहरूनगर, चुनाभ‌ट्टी, आरसीएफ, चेंबुर पोलीस ठाणे येथे जावुन शासकीय व खाजगी कॅमेरे साशारणताः 210 ते 220 कॅमेरे तपासुन फोटो डेव्हलप केले. तसेच,गुप्त बातमीदार यांना सदरचे फोटो दाखवुन माहीती प्राप्त झाली की, गुन्हयातील मोटारसायकल चोरी करणारे व्यक्ती हा हितेश नरेश माळजी,एक अल्पवयीन बालक हे असुन ते आरसीएफ पोलीस ठाणे अंतर्गत चेंबुर वाशी नाका या ठिकाणी राहवयास आहे. या ठिकाणी नमुद पथकाने सापळा लावुन नमुद संशयित हितेश नरेश माळजी (वय 19 रा.आर सी मार्ग, आर एन पार्क जवळ, वाशी नाका, चेंबुर, मुंबई) असे निष्पन्न केले. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीचे राहते घराचे परिसरातुन आरोपीस शिलाफिने ताब्यात घेतले आहे. Mumbai Police Latest Crime News

आरोपीने सदर गुन्हयाची कबुली दिली तसेच आरोपीने र.अ. कि. मार्ग, भोईवाडा, वडाळा, आर सी एफ पोलीस ठाणेस नोंद गुन्हयाची कबुली दिली. त्यानुसार आरोपीकडुन एकुण 1.65 रुपये किंमतीच्या 06 मोटरसायकल निवेदन पंचनामा अन्वये जप्त केल्या असुन विविध पोलीस ठाणेचे एकुण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. तपासदरम्यान आरोपीने त्यास मोटरसायकल चालवण्याची हौस आहे. त्यासाठी तो मोटर‌सायकल चोरी करतो असे सांगितले. Mumbai Police Latest Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, Mumbai CP vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त श्री. सत्य नारायण अपर पोलीस आयुक्त श्री अनिल पाररकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 रागसुधा आर, सहायक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग गावडे आर ए के र्मा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे, पोलीस निरीक्षक सलीम नदाफ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, पोलीस उपनिरीक्षक टिपुसुलतान शेख, पोलीस हवालदार पोटे, पोलीस हवालदार केकान,माळवे, कोळेकर, पोलीस शिपाई डांगे, म्हात्रे,देशमुख,आहेर,राणे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0