मुंबई

Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या खांद्यावर ‘स्टार’ झळकले! पदोन्नतीचा दिमाखदार सोहळा

कर्तव्यनिष्ठेचा सन्मान! पोलीस आयुक्त कार्यालयाने पाच अंमलदारांना दिले ‘पदोन्नती’चे स्टार्स

मुंबई :- कर्तव्य आणि निष्ठेच्या बळावर मुंबई पोलिसांच्या खांद्यावर ‘स्टार्स’ झळकले. पोलीस दलातील 5 कर्तबगार अंमलदारांना पदोन्नती मिळाली असून, त्यांच्या सन्मानार्थ आज, दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी कांदिवली येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘पिपींग सेरेमनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंमलदारांना नवीन पदचिन्हे लावून गौरवण्यात आले.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार, पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या 4 अंमलदारांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली. तर, पोलीस हवालदार पदावर सेवा बजावणाऱ्या एका अंमलदाराला सहायक पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती मिळाली. सत्या सभागृहात आयोजित या सोहळ्यात, त्यांच्या खांद्यावर अभिमानाचे स्टार्स आणि फित लावून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

पोलीस दलात कर्तव्य बजावताना दाखवलेली सचोटी आणि कठोर परिश्रमामुळेच हा सन्मान मिळाल्याचे या अंमलदारांनी सांगितले. हा केवळ त्यांचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाचाही गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पदोन्नतीमुळे मुंबई पोलीस दलात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून, इतर अंमलदारांनाही अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago