क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police : नागपूर हिंसाचारानंतर मुंबई पोलीस सतर्कतेवर, ईदपूर्वी उचलले हे पाऊल

Mumbai Police Latest News : नागपूर हिंसाचारानंतर हफ्ता झाला तरी चार भागात बंद सुरू आहे. यातील गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधरा नगर या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी सुरू आहे.

मुंबई :- नागपुरात नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर Nagpur Violence मुंबई पोलीस सतर्क आहेत. Mumbai Police Alert Mode सणांपूर्वी मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ मफखान नगर परिसरातील संवेदनशील भागात मॉक ड्रील आणि मार्गक्रमण करण्यात आले.ईद आणि गुढीपाडव्याच्या सणाच्या आधी मुंबई पोलिसांच्या दंगलविरोधी पथकाकडून संवेदनशील भागात मॉक ड्रील घेण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व, मुंबईतील संवेदनशील परिसर असलेल्या मरोळ मफखान परिसरात एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांनी मॉक ड्रीलचे आयोजन केले होते. या मॉक ड्रीलमध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे सुमारे 60 ते 70 पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.नागपूरसारखी परिस्थिती उद्भवल्यास पोलीस घटनास्थळी पोहोचून परिस्थिती कशी नियंत्रणात आणू शकते, हा या मॉक ड्रीलचा उद्देश होता.

येत्या काही दिवसांत रमजान, गुढीपाडवा आणि नवरात्री सारखे सण आहेत. अशा स्थितीत नागपुरातील परिस्थिती पुन्हा चिघळण्याची भीती प्रशासनाला आहे. याला सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी आतापासूनच तयारी केली आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0