क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police Mission All Out : मुंबई पोलिसांचे ‘ऑलआऊट ऑपरेशन’, 207 ठिकाणी छापे, 54 जणांना अटक

Mumbai Police Mission All Out Update : मुंबईत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ केले. या कारवाईत पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. यापैकी अनेक गुन्हेगार होते ज्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट होते.

मुंबई :- मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री नियमित ‘ऑल आउट ऑपरेशन’ केले आणि 54 लोकांना अटक केली. Mumbai Police Mission All Out सुरक्षा वाढवण्यासाठी संपूर्ण शहरात 113 नाकाबंदी लागू करण्यात आली होती. 12 जणांना अटक करण्यात आली आहे, जे फरार आहेत किंवा पोलिसांच्या वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट आहेत.

पोलिसांनी सांगितले की, ज्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट होते अशा किमान 12 जणांनाही अटक करण्यात आली आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन मध्ये पुढील कारवाई करण्यात आली

  • बृहन्मुंबई शहरात ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान एकुण 207 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले,
  • ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पाहिजे व फरारी आरोपी असे एकूण 12 आरोपी अटक करण्यात आले.
  • मुंबई पोलीस कायद्यांच्या कलम 142 अन्वये 54 आरोपींवर कारवाई करण्यात आली.
  • ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र (Illegal weapons) बाळगणाऱ्या एकुण 16 इसमांवर कारवाया करण्यात आल्या.
  • ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान जुगार आणि इतर अवैध धंद्यावर 14 ठिकाणी छापे टाकून कारवाया करण्यात आल्या.
  • ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान एकूण 46 आरोपींवर अजामिनपात्र वॉरंटची तसेच 25 आरोपींवर स्टॅडींग वॉरंटची बजावणी करण्यात आली.
  • ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर एकूण 15 केसेस दाखल करण्यात आल्या.

महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 120,122 अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण 56 कारवाया करण्यात आल्या आहेत.

ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाण्यांचे ह‌द्दीत एकुण 113 ठिकाणी नाकाबंदी (Nakabandi) लावण्यात आली होती.

1.त्यामध्ये एकुण 6901 दुचाकी/चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.

2.मोटार वाहन कायद्यान्वये 1891 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

3.कलम 185 मोवाका अन्वये 70 वाहन चालकांवर Drunk & Drive ची कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर ,विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण यांनी पोलीस ठाणे, विशेष नाकाबंदीचे ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले व ऑल आऊट ऑपरेशन प्रभावीपणे राबविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0