Mumbai Police : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात आयोजित “प्रबोन” सांगता पोलीस आयुक्त हस्ते
•Mumbai Police पोलीस आयुक्तालयकडून जागतिक अमली पदार्थ दिनानिमित्त औचित्य साधून “प्रबोध”, अंतर महाविद्यालय स्पर्धा आयोजित, अकरा महाविद्यालयाचा समावेश, स्पर्धेत एस एन महाविद्यालय अव्वल
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या अभिनय कल्पनेतून “प्रबोध” या संकल्पनेचा समोर आली, त्यानुसार 26 जून या अंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून अंतर महाविदयालयातील विदयार्थ्यांचा सक्रिय सहभाग व्हावा, यासाठी अंतर महाविदयालयीन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.पोलीस आयुक्तालयाच्या माध्यामतून शाळा, महाविद्यालायांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. पोलीस आयुक्तालयाच्या माध्यामतून आयोजित केलेली या स्पर्धेत ओव्हरऑल बेस्ट सेलिब्रेशन या स्पर्धेत एसएन कॉलेज अव्वल ठरले आहे. तर, मोस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया मध्ये वर्तक कॉलेजने बाजी मारली आहे.
पोलीस आयुक्तालया अंतर्गत 11 महाविदयालयांमध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकीग स्पर्धा, रिल्स बनविण्याची स्पर्धा, एकपात्री नाटक व सांधिक नृत्य अशा पाच प्रकारच्या स्पर्धा विदयाध्यांसाठी तसेच सर्वोत्कृष्ट उत्सव, सर्वात नावीन्यपूर्ण कल्पना इत्यादी विषयांवरील स्पधीचे आयोजन त्या त्या महाविदयालयांमध्ये करण्यात आलेले होते. या स्पर्धामधून प्रथम आलेल्या सर्व विदयाथ्र्यांची आंतर महाविदयालयीन प्रबोधची अंतिम फेरी शुकवारी लता मंगेशकर नाटयगृह, मिरारोड (पूर्व) येथे पार पडलेली आहे.
रांगोळी या स्पर्धेमध्ये एल. आर. तिवारी या महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. पोस्टर मेकींग स्पर्धेमध्ये विवा महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. रिल्स बनविण्याची स्पर्धेमध्ये वर्तक महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे.
एकपात्री नाटक स्पर्धेमध्ये दालमिया महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. सांघिक नृत्य चा स्पर्धेमध्ये रिना मेहता महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. जागतिक अंमली पदार्थ दिनानिमीत्त मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये असा प्रकारची स्पर्धा प्रथमच आयोजीत करण्यात आली असून सदर स्पधेला महाविदयालयीन विदयाध्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.
आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ तसेच मिरा- भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांचे हस्ते झाले.स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून संजीव त्यागी (कलाकार), फिरोज खान (नृत्यनिर्देशक), किशन बाल (कलाकार), स्नेहलता माघाडे (कलाकार), गौतम सुतार (रांगोळी करीता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेता) यांनी काम पाहिले.