Mumbai Police: परिमंडळ-12 कार्यालय सह वनराई, आरे, दिंडोशी, कुरार, समता नगर, कस्तुरबा मार्ग व दहिसर सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ

Mumbai Police News : कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, नियोजन, कामाची गती या विविध 14 निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परिमंडळ-12 पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळालेले आहे.
मुंबई :- मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ 12 कार्यालयासह कार्यालयीन वनराई, आरे, दिंडोशी, कुरार, समता नगर, कस्तुरबा मार्ग व दहिसर सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे.स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन, कामाची गती या विविध 14 निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.परिमंडळ-12 पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन मिळाले आहे. Mumbai Police Latest News


मोहिमेदरम्यान परिमंडळ 12 कार्यालय व परिमंडळ 12 मधील वनराई, आरे, दिंडोशी, कुरार, समता नगर, कस्तुरबा मार्ग व दहिसर पोलीस ठाणे यांनी सर्व निकषांची पुर्तता करताना कामकाजाचा स्तर वाढविला आहे. तसेच आयएसओ ९००१:२०१५ (Quality Management System) चे निकषांची पुर्ततादेखील केल्याने अब्युल्युट कन्सल्टंटस या संस्थेने रितसर तीन टप्प्यात पाहणी करून परिमंडळ 12 कार्यालय, तसेच परिमंडळ 12 मधील सर्व सातही पोलीस ठाणे यांना आयएसओ ९००१:२०१५ (Quality Management System) प्रमाणपत्र प्रदान केले आहे. पाहणी दरम्यान कार्यालयीन कार्यपध्दती, अभिलेख जतन पध्दती, स्वच्छता, नागरिकाकरिता देण्यात येणारे सुविधा या व इतर विविध निकषांचा आढावा घेवून त्यात आवश्यकतेनुसार सुचविलेल्या बदलांची पुर्तता करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त, बृहन्मुबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का.व सु.), सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई अभिषेक त्रिमुखे यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ-12, मुंबई पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील, परिमंडळ-12 मधील सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त व सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कामगिरी पार पाडली आहे.


