Mumbai Police Latest News
Mumbai Police Take Action Against Chain Snatcher : सोनसाखळी हिसकावून दुचाकीवर पसार! घाटकोपर-मुलुंड पोलिसांच्या तडाख्यात तिघे जेरबंद,मुख्य आरोपीवर तब्बल 8 गुन्हे; उत्तर भारतातून मुंबईत येत चोरी करायचा मास्टर प्लान उघड
मुंबई :- मुंबईच्या रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत घाटकोपर आणि मुलुंड पोलिसांनी केवळ 24 तासांत एक धडाकेबाज कारवाई करून तीन कुख्यात आरोपींना अटक केली आहे. Mumbai Police Take Action Against Chain Snatcher ही कामगिरी एखाद्या थ्रिलर सिनेमाला शोभेल अशी असून, यामध्ये स्थानिक गुन्हेगारांसह उत्तर भारतातील आरोपींचाही समावेश आहे. Mumbai Police Latest News
30 मे रोजी सकाळच्या सुमारास, घाटकोपर पूर्वेतून एक महागडी दुचाकी चोरी झाली आणि त्याच दिवशी मुलुंडमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी झडपडण्यात आली. या दोन वेगवेगळ्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली होती.पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबर्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढत डॉरमेटरीत लपलेल्या टोळीला मस्जिद बंदर परिसरातून जेरबंद केलं.
या टोळीने चोरीसाठी आधी दुचाकी चोरी केली आणि नंतर तिचा वापर करून सोनसाखळी हिसकावली. मुख्य आरोपी प्रेशितवर आधीच भायखळा, समतानगर, नेरुळ व सायबर क्राइम यांसारख्या ठिकाणी 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीचा “हिट अँड रन” फॉर्म्युला पोलीसांनी पूर्णपणे उघड केला आहे.
ही कारवाई देवेन भारती, पोलीस आयुक्त, Mumbai CP Deven Bharti बृहन्मुंबई, सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयुक्त (का व सु), महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या आदेशान्वये व राकेश ओला, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7 यांच्या मार्गदर्शनाखाली, शैलेश पासलवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, घाटकोपर विभाग, मुंबई यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी (गुन्हे), पोलीस निरीक्षक राजेश वंदूगडे (रात्रपाळी पर्यवेक्षक अधिकारी), पोलीस उप निरीक्षक विक्रम ताकमोगे, पोलीस उप निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उप निरीक्षक प्रशांत तायडे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार अनुसे, पोलीस शिपाई रोकडे, पोलीस शिपाई आंब्रे, पोलीस शिपाई सोनवेन, पोलीस शिपाई दळवी, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई राठोड यांनी यशस्वीरीत्या कार्यवाही पार पाडली.
पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी शहरात येताच काही तासांत गुन्हे करून पुन्हा गायब होत असे. पण या वेळी मुंबई पोलिसांनी त्यांचा हिशोब एकदाचा मांडला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…