Mumbai Police Arrested Mooca Criminal Akbar khau : एमडी तस्करीत सक्रिय असलेला सराईत डॉन जेरबंद; 12 लाख 80 हजारांचे मेफेड्रॉन जप्त
मुंबई :- मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिटने अंमली Ghatkopar Police पदार्थांच्या तस्करीतील एका मोठ्या ‘माशा’ला गजाआड करत महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. एम. डी. (मेफेड्रॉन) गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अहमद मोहम्मद शफी शेख उर्फ अकबर खाऊ याला Criminal Akbar Khau ओरिसा राज्यातील सुंदरगढ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
64 ग्रॅम एम. डी. जप्तीच्या एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या अकबर खाऊच्या अटकेने तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. तपासामध्ये हे निष्पन्न झाले की, जिल्हा-ठाणे येथील मोक्का कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर ‘अकबर खाऊ’ पुन्हा अंमली पदार्थांच्या विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय झाला होता. त्यानेच या गुन्ह्यातील अटक आरोपी फरीद चुहाला अंमली पदार्थ पुरवले होते.
ओरिसातील राजगंगपूरमधून अटक
हा पाहिजे आरोपी सध्या ओरिसा राज्यातील राजगंगपुर, सुंदरगढ येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली. वरिष्ठांच्या परवानगीने त्वरित पोलीस पथक ओरिसाला रवाना झाले आणि 1 नोव्हेंबर रोजी राजगंगपुर शहरातील ख्बानी चौक येथे ‘अकबर खाऊ’ला अटक करण्यात आली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला आणि आज (5 नोव्हेंबर) किल्ला कोर्टाने त्याला दि. 7 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकबर खाऊ हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कुर्ला, व्ही. बी. नगर पोलीस स्टेशन आणि अंमली पदार्थ विरोधी कक्ष येथे चोरी, खुनाचा प्रयत्न, मारामारी, आणि NDPS कायद्यांतर्गत तब्बल 18 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण 2 आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण 64 ग्रॅम एम.डी. (किंमत अंदाजे 12 लाख 80 हजार रुपये) जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सुधीर हिरडेकर आणि घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले, पोलीस निरीक्षक भगतान बेले, पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील व त्यांच्या पथकाने ही अत्यंत यशस्वी कामगिरी केली आहे.
या सराईत गुन्हेगाराच्या अटकेमुळे मुंबईतील अंमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…