Mumbai Crime News : मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखा 3 ची मोठी कारवाई; गॅंगस्टर छोटा राजन यांचा साथीदाराला अटक
•गँगस्टर छोटा राजन टोळीतील गुंडास बंदुकीसह गुन्हे शाखा-3 मुंबई यांनी अटक केली
मुंबई :- गॅंगस्टर छोटा राजन टोळीतील गुंडास मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखा-3 यांनी अटक केली असून 26 फेब्रुवारी सायंकाळ दरम्यान शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रॉड्रीक्स हा कृष्णा हॉटेल, जिजामाता नगर, वरळी, मुंबई येथे अग्नीशस्त्र / पिस्तूल सह येणार असल्याची खात्रीशीर माहिती कक्ष 3 गुन्हे प्रकटीकरण शाखा मुंबई कार्यालयास प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कक्ष 3 च्या पथकाने कृष्णा हॉटेल, जिजामाता नगर, वरळी, मुंबई येथे सापळा रचून नमुद गुंडास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे 01 देशी बनावटीचे पिस्तूल व 03 जिवंत काडतुसे / राऊंड मिळून आली. सदरबाबत ताब्यात घेतलेल्या इसमाकडे चौकशी करता, त्याचेकडे नमुद अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. Mumbai Crime News
नमुद अग्निशस्त्र व काडतुसे जप्त करुन आरोपी शाम पांडुरंग तांबे उर्फ सॅव्हीओ रॉड्रीक्स, (42 वर्षे), मुंबई याचेविरुध्द कलम 3,25शस्त्र अधिनियम सह कलम 37(1) (अ), 135 महाराष्ट्र पोलीस कायदा वरळी पोलीस ठाणे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयात आरोपी यास अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हा गॅगस्टर छोटा राजन टोळीचा सदस्य असुन त्याचे विरुध्द मुंबईतील अनेक पोलीस ठाणेत खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर बंदूक (अग्नीशस्त्र) बाळगणे अशा विविध गंभीर गुन्हांची नोंद आहे. गुन्हयाचा तपास कक्ष 03 कडून करण्यात येत असुन, कक्ष 3, मुंबई यांनी केलेल्या कामगिरीमुळे सदर आरोपीकडुन भविष्यात घडणाऱ्या गंभीर अपराधांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. Mumbai Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती Deven Bharti, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई लखमी गौतम Lakhmi Gautam, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना Shashikumar Meena,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे , सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य) चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष -3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे, पोलीस निरीक्षक शामराव पाटील, पोलीस हवालदार आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे,भास्कर गायकवाड, शिवाजी जाधव यांनी पार पाडली आहे. Mumbai Crime News