•Mumbai Police Constable Suicide News मुंबईतील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरी पोलीस कॉन्स्टेबल ची आत्महत्या, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती
मुंबई :- पोलीस विभागात गेले काही दिवसांपासून मानसिक तणावामुळे आत्महत्या झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना मुंबईतील एका पोलीस कॉन्स्टेबल बाबत समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना सायन च्या प्रतीक्षा नगर मधून समोर आली आहे.विजय साळुंखे (38 वर्ष)असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्याने सायनमधील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरात गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. Mumbai Police Constable Suicide News
विजय साळुंखे सायनच्या प्रतीक्षा नगर येथे राहत होते. ते शाहू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 30 मे पासून पोलीस कॉन्स्टेबल रजेवर होते. मृत विजय साळुंखे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी विजय साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. Mumbai Police Constable Suicide News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…