Mumbai Police : 500 रुपयांच्या नोटा छापणाऱ्या टोळीचा भायखळा पोलिसांनी केला पर्दाफाश, टोळीच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या
Mumbai Buyculla Police Arrested Fake Currency Maker : भायखळा पोलिसांनी बनावट 500 रुपयांच्या नोटा छापणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सापळा रचून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 200 बनावट नोटा, प्रिंटिंग मशीन, लॅमीनेशन मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे
मुंबई :- बनावट नोटांच्या सुळसुळाट मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. Fake Currency Maker बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठात चालवल्या जातात. याच्यात फार कमी साम्य असल्यामुळे बनावट आणि खरी नोट ओळखणे सर्वसामान्यांना जोखमीचे ठरते. परंतु मुंबईतील भायखळा Mumbai Buyculla Police पोलिसांनी एका बनावटी नोटांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या जवळी बनावट नोटाही जप्त केल्या आहे.
भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त बातमीदाराकडून भायखळा पूर्व येथे 3 व्यक्तींना हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होते. संबंधित ठिकाणी पोलिसांनी दोन पथक तयार करण्यात आले. ते घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानंतर तीन संशयीत तिथे आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या जवळ भारतीय चलनाच्या 500 रूपये किंमतीच्या 200 बनावट नोटा मिळून आल्या. ताब्यात घेतलेल्या तीन व्यक्तींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता पालघर जिल्ह्यातील वाडा येथे बनावट नोटा बनवत असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी वाडा येथे जाऊन आरोपी निरज वेखंडे आणि खलील अन्सारी हे बनावट नोटा तयार करत असलेचे आढळून आले. पोलिसांनी 500 रूपयांच्या बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळून आले. यात लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन, लॅमीलेशन मशीन, तसेच A4 साईजचे 1367 नग बटर पेपर जप्त केले. या प्रकरणी उमरान उर्फ आसिफ उमर बलबले, यासिन युनूस शेख, भीम प्रसादसिंग बडेला आणि निरज वेखंडे यांना अटक केली. त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात कलम 178,179,180,181,182,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
सत्यनाराण चौधरी, पोलीस सह आयुक्त (का व सु), अनिल पारसकर, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, दत्तात्रय कांबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -3, शंकर चिंदरकर, सहायक पोलीस आयुक्त, आग्रीपाडा विभाग, चिमाजी आढाव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भायखळा पोलीस ठाणे, जितेश शिंगोटे पोलीस निरीक्षक गुन्हे, नवनाथ घुगे पोलीस निरिक्षक प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक बालाजी असादे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस हवालदार हर्षल देशमुख, राकेश कदम, रामदास पठारे, पोलीस शिपाई राजेश राठोड, राकेश जाधव, सोमनाथ जगताप, व राजेश पाटील, अनिरूध्द सावंत, प्रणित सोनावणे, जगदिश देसाई,अविनाश चव्हाण (परिमंडळ 3) यांनी केली आहे.