Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरांचा पर्दाफाश, 3 आरोपींना अटक, 59 फोन जप्त
•Mumbai Police Busted Mobile Phone Thieves मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अंधेरी परिसरातून अटक केली आहे. चोरट्यांच्या ताब्यातून 59 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई :- मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन जणांना अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. मोबाईल चोरणारी टोळी मुंबईत बऱ्याच दिवसांपासून सक्रिय होती. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोबाईल हिसकावण्याच्या तसेच चोरीच्या घटना घडत आहेत. मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
26 जून,रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम 85 हजार रुपये चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.ओशिवरा पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी परिसरातील मेगा मॉलसमोरील पुला खाली संशयित आरोपी एकत्र येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे.अफजल मुश्ताक शाह (19 वर्ष), साबीर इरफान खान (30 वर्ष), उर्मिला प्रकाश मोरया उर्फ पिंकी (35 वर्ष) यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने शहरात विविध ठिकाणी मोबाईल फोन चोरी केल्याचे कबुली दिली आहे. तीन लाख 15 हजार रुपयांचे 59 मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले असून आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलीस पथक
ओशिवरा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, सहाय्यक फौजदार सुनिल खैरे, पोलीस हवालदार आनंद पवार, सिध्दार्य भंडारे, धनंजय जगदाळे, पोलीस शिपाई राजेंद्र चव्हाण, सुजय शेरे, योगेश नागरे व सोनुसिंह पाटील यांनी पार पाडली आहे.