क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police Bribe News : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला एक लाखांची लाच स्वीकारताना अटक

Mumbai Police Officer Arrested By ACB : एक लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

मुंबई :- पोलीस संरक्षण देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली त्याचा पहिला हप्ता एक लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली मुंबईतील शिवाजी नगर पोलीस Mumbai Shivaji Nagar Police Station ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख (57 वय) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी अटक केली. एसीबीच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली. Mumbai Police Officer Arrested By ACB For Taking Bribe

एसीबीने याबाबत दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे एका ट्रस्टचे ट्रस्टी असून सदर ट्रस्टच्या शाळेच्या परिसरात 15/08/2024 रोजी काही व्यक्तींनी शाळेच्या गेटचे कुलूप तोडून जबरदस्तीने प्रवेश केला होता. त्याबाबत तक्रारदार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांना मदत करण्यासाठी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय (वरळी, मुंबई) यांचा अंतिम आदेश येईपर्यंत त्या ट्रस्टच्या परिसरात विरोधकांना प्रवेश करू न देण्यासाठी तसेच पोलीस संरक्षण देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडीअंती रक्कम अडीच लाख स्वीकारण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मान्य केल्याचे मंगळवारी (13 मे) रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने. एसीबीने सापळा रचून वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी लाचेचा पहिला हप्ता रक्कम एक लाख स्वीकारताना देशमुख यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0