Mumbai Police Bribe News : लाचखोर पोलीस शिपाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक
Mumbai Police Bribe News : लाच घेताना पोलीस शिपाईला रंगेहाथ पकडले, लाचलुचपत विभागाकडून आरोपीला अटक पोलीस शिपाई यांनी पोलीस हवालदार यांना कर्तव्यावर गैरहजर राहिल्यास दरमहा 8-10 हजार रुपयाची लाच Bribe द्यावे लागेल, तडजोडी अंत 300 प्रति दिवस लाच..
मुंबई :- पोलीस विभागातून Mumbai Police Division एक धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. नोकरीवर गैरहजर राहिल्यास दरमहा आठ ते दहा हजार रुपये द्यावे लागेल. तडजोडी अंत पोलिसा शिपाई यांना प्रति दिवस तीनशे रुपये अशी रक्कम ठरवून दिली. त्याप्रमाणे पोलीस शिपाई सुयश शरद कांबळे (34 वर्ष) यांनी सहा दिवस कर्तव्यावर गैरहजर राहिले नाही पोलीस हवालदार Police Hawaldar यांच्याकडून तीनशे रुपये प्रमाणे सहा दिवसाचे अठराशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई Mumbai Anti Corruption Department यांनी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
नेमकं घडलय काय ?
यातील तक्रारदार हे मशम्य पोलीस दल मरोळ, ल.वि. 4, मुंबई येथील ‘एच’ कंपनीत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून कुर्ला कोर्ट येथे कर्तव्य करीत होते. दिनांक 1 मे 2025 रोजी ‘एच’ कंपनीचे मदतनीस लोकसेवक सुयश शब्द कांबळे, पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांना मोबाईलवर सांगितले की, तुम्हाला इतरत्र कर्तव्य देतो. तक्रारदार यांनी कुर्ला कोर्ट येथेच कर्तव्य देण्याची विनंती केली. त्यावरून लोकसेवक यांनी तक्रारदार यांना कर्तव्यावर गैरहजर राहण्यास महिन्याला 8 ते 18 हजार दयावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी दिनाक 9 मे 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे समक्ष हजर राहुन लेखी तक्रार केली. Mumbai Anti Corruption Latest News
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून 12 मे 2024 पंचासमक्ष केलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक यांनी फिर्यादी यांचेकडे गैरहजर गहणेकामी प्रतिदिनी 400 द्यावे लागतील असे सांगून तडजोडीअंती प्रतिदिनी 300 प्रमाणे लाचेची मागणी केली.
16 मे 2024 केलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक यांना तक्रारदार यांच्याकडून एकूण 06 दिवसाचे 1800 रुपये लाचेची स्विकारताना पकडण्यात आले, म्हणुन सुयश शरद कांबळे, पो.शि.क्र. यांचेविरूध्द कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Mumbai Anti Corruption Latest News
विजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Mumbai Anti Corruption Latest News मुंबई राजेंद्र मांगळे, अपर पोलीस उप आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई. नितीन दळवी, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपाई यांना अटक केली आहे.