Mumbai Police : सायबर गुन्ह्यांविषयी समाजमाध्यमांतून जनजागृती; सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचा उपक्रम
•मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा सायबर जनजागृती उपक्रम Our Lady of Nazareth High School, विद्यार्थी शिक्षकांना सायबर सुरक्षितेचे धडे
भाईंदर :- Our Lady of Nazareth High School या शाळेमध्ये मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून सायबर जनजागृती कार्यक्रम राबवला होता. या कार्यक्रमाला शाळेतील जवळपास 600 विद्यार्थी आणि मोठ्या संख्येवर शिक्षक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हेगारांपासून कशाप्रकारे बचाव करायचा काय उपाययोजना करायचे याच्या सर्वांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि शिक्षकांना करण्यात आले आहे.
ट्विटर आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचावे, फसवणूक झाल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधावा तसेच सायबर गुन्ह्यांबाबतचे कायदे, समाजमाध्यमांतून होणारे लैंगिक छळ, ऑनलाइन व्यवहारात होणारी फसवणूक आणि त्यापासून बचाव यासर्व गोष्टींची माहिती नागरिकांना माहितीपत्रकांद्वारे दिली जात आहे.
आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे कल दिसून येतो. असे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. तसेच काही नागरिक जास्त पैसे मिळविण्याच्या किंवा कमविण्याच्या अमिषाला बळी पडतात आणि आपल्या बँक खात्याविषयीची सर्व गोपनीय माहितीची देवाणघेवाण करतात. याचाच फायदा घेत काही भामट्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच तरुण-तरुणी आपल्या खासगी आयुष्याची माहिती, छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्याच्या बाबतीत आहारी गेल्याचे दिसून येते. याच खासगी माहितीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून काही समाजकंटक पैसे उकळतात. या प्रकारच्या गुन्ह्यांबाबत कुठे तक्रार करावी, सायबर गुन्हे शाखेशी कसा संपर्क साधावा तसेच सायबरक्राईम या संकेत स्थळाला भेट देणे याबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हे सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. अशी संपूर्ण माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिली आहे.