क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police : चोरीला गेलेले तब्बल 203 मोबाईल हस्तगत; पवई पोलिसांची कामगिरी

Mumbai Police Returned 203 Stolen Mobile : गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत पवई पोलीस ठाणे हद्दीतून अनेक प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊन गुन्हे दाखल झाले होते.

मुंबई :- मुंबईतील पवई पोलीस ठाणे Mumbai Powai Police Station हद्दीत गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत चोरीला Mobile Robbery In Mumbai गेलेले, पादचाऱ्यांकडून लुटलेले तब्बल 203 मोबाईल पवई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हस्तगत केले आहेत. हे मोबाईल महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती पवई पोलिसांनी दिली असून आहे. पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या गुन्ह्यात चाळीस आरोपींना अटक केली आहे. Mumbai Police Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत पवई पोलीस ठाणे हद्दीतून अनेक प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊन गुन्हे दाखल झाले होते. दहा महिन्यात पोलिसांनी आत्तापर्यंत 40 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 203 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. तसेच ज्यांचे मोबाईल चोरीला गेले आहे त्या संदर्भात ज्यांनी तक्रारी दिली आहे त्यांना त्यांच्या कागदपत्राच्या आधारे ते मोबाईल पुन्हा परत करत आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Mumbai Police Latest News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, परमजीत सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 10, मुंबई मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग, मुंबई सुर्यकांत बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक गणेश पाटील (गुन्हे), पोलीस निरीक्षक जयदिप गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, पोलीस हवालदार तानानी टिळेकर, बाबू येडगे, चव्हाण, आदित्य झेंडे, पोलीस शिपाई संदिप सुरवाडे, पाटील,सुर्यकांत शे‌ट्टी, साटम,प्रशांत घुरी,कुंदे यांनी पार पाडली आहे. Mumbai Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0