क्राईम न्यूज

Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नव्या वर्षाची अनोखी भेट! 637 नागरिकांना मिळाले त्यांचे हरवलेले मोबाईल; 1.08 कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Mumbai Police Unit 4 : परिमंडळ-4 ची धडाकेबाज शोधमोहीम; 2022 पासून चोरीस गेलेले फोन महाराष्ट्र आणि परराज्यातून शोधून काढले

मुंबई | नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी शेकडो नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. परिमंडळ-4 Mumbai Police Unit 4 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांनी विशेष मोहीम राबवून 2022 ते 2025 या कालावधीत चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले 637 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. आज 30 डिसेंबर रोजी एका विशेष कार्यक्रमात 1 कोटी 8 लाख रुपये किमतीचे हे सर्व फोन मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आले. Mumbai Police Mobile Robbery News

दोन महिन्यांची विशेष शोधमोहीम

पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-4 च्या मार्गदर्शनाखाली 27 ऑक्टोबर 2025 पासून ही विशेष शोधमोहीम राबविण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि सायबर पथकाच्या मदतीने पोलिसांनी मुंबई, महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून हे मोबाईल शोधून काढले. या मोहिमेत अवघ्या दोन महिन्यांत (27 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर) 637 मोबाईल पोलिसांच्या हाती लागले.

1 कोटी 8 लाखांचा मुद्देमाल परत

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची अंदाजे किंमत 1 कोटी 8 लाख 41 हजार 300 रुपये इतकी आहे. यामध्ये अनेक महागड्या स्मार्टफोनचा समावेश आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तक्रारदारांना बोलवून त्यांचे फोन सुपूर्द करण्यात आले. आपला हरवलेला फोन पुन्हा मिळाल्याने अनेक नागरिकांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.

या पोलीस ठाण्यांचा मोहिमेत सहभाग

परिमंडळ-4 अंतर्गत येणाऱ्या खालील पोलीस ठाण्यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

भोईवाडा विभाग

माटुंगा विभाग

सायन विभाग

काळाचौकी, आर. ए. किडवाई मार्ग, एल. टी. मार्ग आणि वडाळा टी. टी. पोलीस ठाणे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदर हस्तांतरण कार्यक्रम पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण आणि अपर पोलीस आयुक्त देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पोलीस उप-आयुक्त रागसुधा आर. यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही यशस्वी झाली. या मोहिमेत 9 अधिकारी आणि 12 अंमलदारांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago