Mumbai Police Return 800 Stolen Mobile : परिमंडळ-6 मधील चोरीस गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना वितरित
मुंबई :- बृहन्मुंबई पोलीस दलाच्या ‘चोरीस गेलेला मुद्देमाल परत’ करण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत पूर्व प्रादेशिक विभागाने आज, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. परिमंडळ-6 मधील पोलीस Unit 6 Mumbai ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. Mumbai Latest Robbery News
या मोहिमेचा मुख्य भाग म्हणून, गोवंडी येथील ग्रँड बॅन्क्वेट हॉल, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत “भव्य समारंभाचे” आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सुमारे 800 मोबाईल फोन आणि इतर हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकांना वितरीत करण्यात आला. Mumbai Latest Crime News
अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली. यावेळी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-6, समीर शेख, परिमंडळ-6 मधील सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सायबर अधिकारी उपस्थित होते. Mumbai Latest Crime News
चोरीला गेलेले मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिलेल्या या ‘भेट’बद्दल नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…