Mumbai Police Busted 115 Crore worth Drugs : 7.5 किलो ‘एमडी’ पावडर आणि 38 किलो लिक्वीड जप्त; मुलुंड, ठाणे, पुणेमार्गे साताऱ्यातील दुर्गम ठिकाण गाठले; प्रमुख सूत्रधाराच्या शोधात पोलीस
मुंबई :- अंमली पदार्थांच्या जगतात मोठी खळबळ माजवणारी आणि एखाद्या थरारपटासारखी असलेली कारवाई मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेनेMumbai Police Crime Branch यशस्वीरित्या पार पाडली आहे! मुलुंड येथून सुरू झालेल्या दोन किरकोळ अटकेच्या तपासाने थेट सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मेफेड्रॉन (Mephedrone/MD) अंमली पदार्थ बनविणाऱ्या एका भूमिगत कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 115 कोटी रुपये किमतीचा प्रचंड मोठा मुद्देमाल जप्त करून अंमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा धक्का दिला आहे. Mumbai Police Latest Crime News
थरार असा घडला
कारवाईची सुरुवात मुंबईतील मुलुंड येथे झाली, जिथे दोन आरोपींकडून किरकोळ 136 ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले.
या दोन आरोपींच्या चौकशीतून तपास ठाण्यातील घोडबंदरपर्यंत पोहोचला. तेथील आरोपीने कबूल केले की त्याने पुणे येथील रावेत येथील सॅन्टोसा हॉटेलजवळून हा अंमली पदार्थ घेतला होता.
तात्काळ पोलिसांनी ठाणे आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले.
पुण्यातील आरोपीने अखेर तोंड उघडले आणि या रॅकेटचे गुपित सांगितले: मेफेड्रॉन तयार करण्याची फॅक्टरी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावरीगाव येथील एका प्लॅस्टर नसलेल्या विटांच्या शेडमध्ये लपलेली होती.
पोलीस पथकाने कसून शोध घेत साताऱ्यातील या ठिकाणी छापा टाकला आणि अंमली पदार्थ बनविणारा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त केला. यावेळी 7.5 किलो ‘एमडी’ पावडर, 38 किलो ‘एमडी’ लिक्वीड आणि मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जप्त करण्यात आला. या ठिकाणाहून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत / कक्ष-7 यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर, सुहास खरमाटे, अमोल माळी, रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील काळे, महेश शेलार व पोलीस पथक तसेच गुन्हे शाखेने ही धाडसी आणि अत्यंत गुप्त मोहीम यशस्वी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांची पुढील चक्रे वेगाने फिरणार आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…