Mumbai Online Fraud : ऑनलाइन फसवणूक, पोलिसांकडून तक्रारदार चे पैसे परत करण्यास मोठे यश
Mumbai Police Arrested Online Fraud Criminal : उत्तन सागरी पोलीस ठाणेस यश ; गुगल रिव्हीव शेअर करण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील 100 टक्के रक्कम तक्रारदार यांना परत.
भाईंदर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे गिफ्टसन विजय माल्या, (28 वर्षे), यांना wendy_chapman या इंस्टाग्राम अकाउंट तसेच या मोबाईल नंबर वरून वर्क फ्रॉम होम ची माहिती देवून त्यांनी दिलेले टास्कमधील कंपनी व रेस्टॉरंटचे गुगल रिव्हीवचे स्क्रीनशॉट पाठविण्याचे टास्क देवून त्याबदल्यात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवणुक करण्यास सांगुन त्यांची 3 लाख 84 हजार रूपये रकमेची फसवणुक झाली होती Mumbai Online Fraud . सदर फसवणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे उत्तन सागरी येथे भा.दं. वि.सं. कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम-२००८ कलम 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयात एकापेक्षा जास्त पिडीत आहेत. गुन्हयाचा तपास करीत असतांना आरोपीनी फिर्यादी पिडीत यांची रक्कम स्विकारण्यासाठी तसेच ती रक्कम वेगवेगळया बैंक अकाउंटमध्ये वळती करण्यासाठी वापर केलेले अनेक बैंक अकाउंट निष्पन्न झालेले होते. त्यामुळे तक्रारदार यांचे पैसे परत मिळविण्याकरिता सदरच्या बैंक अकाउंटमधील रक्कम गोठविण्यात आलेली होती. त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरिता उत्तन सागरी पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार गिफ्टसन माल्या यांची फसवणुक झालेली 3 लाख 84 हजार ही रक्कम त्यांच्या बैंक खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे. Mumbai Online Fraud
गिफ्टसन माल्या यांनी पोलिसांचे म्हणले आभार
“काल संध्याकाळी माझी फसवणुक झालेली रक्कम माझे बैंक खात्यावर क्रेडीट झालेली आहे. Thank You Sir… मी तुमचा माझ्या आयुष्यात खुप ऋणी राहीन.”
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 1 मिरारोड, दीपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उत्तन सागरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादाराम करांडे, ऋषिकेश पवळ, पोलीस निरिक्षक (गुन्हे), पोलीस हवालदार राजाराम आसवले, दिलीप सनेर यांनी पार पाडली आहे.