मुंबईः व्हॉट्सअप वर लिंक पाठवून ऑनलाईन फसवणूक,दोन जणांना अटक
Mumbai Cyber Fraud News : व्हॉट्सअपवर लिंक पाठवून मोबाईल हॅक करून बँकेतील पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या शीव पोलिसांनी अटक केली आहे.100हुन अधिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली आहे
मुंबई :- व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांचा मुंबई पोलिसांच्या शीव पोलिसांनी Mumbai Sion Police जेरबंद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना चेन्नई, तामिळनाडू येथून अटक केली आहे. दोन्ही आरोपींवर शंभरहून अधिक तक्रार दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांना अज्ञात व्यक्तीने 26 नोव्हेंबर 2024,व्हॉटसअप वर लिंक पाठवून मोबाईल फोन हॅक करून Mumbai Phone Hack त्यांच्या बँकेचे डिटेल घेतली. 30 नोव्हेंबरच्या दरम्यान फिर्यादी यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून तब्बल वीस वेळा ट्रान्झेक्शन करून एक लाख रुपये एवढी रक्कम काढण्यात आल्याची तक्रार शीव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपीचा तपास घेताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे चेन्नई, तामिळनाडू येथे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे,पोलीस शिपाई कुंभार,डबडे यांच्या पथक चेन्नई तामिळनाडू येथे पाठवण्यात आले होते. पोलिसांनी एकूण चार आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींची सखोल चौकशी केली असता दोन आरोपींना पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केले आहे. पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्याचे तपासणी केली असता आरोपींचे करंट अकाउंट ओपन करून ते telegram वरून परदेशी नागरिकांना कमिशन वर वापरण्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
कार्थिक विश्वनाथन व नंदकुमार कुमारन असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांना 24 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल फोन, सहा सिम कार्ड, तीन डेबिट कार्ड जप्त करण्यात आले असून फसवणुकीतील 70 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात आरोपींच्या खात्याचा वापर करून करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात माहिती समोर आली आहे. राजस्थान,कर्नाटक, तामिळनाडू,पश्चिम बंगाल, झारखंड गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा तसेच इतर अनेक राज्यात शंभरहून अधिक फसवणुकीच्या ऑनलाईन तक्रारी सायबर पोलिसांच्या पोर्टलवर दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून पोलीस आणखी आरोपींचा शोध घेत आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभागअनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सायन विभाग शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीव पोलीस ठाणे मनीषा शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय जगताप, सायबर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे, पोलीस हवालदार ठोके (तांत्रिक मदत), पोलीस शिपाई कुंभार, पो.शि. डबडे यांनी गुन्हा उघडकीस करण्याकरीता गतिमान कारवाई करून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.