Mumbai No Parking News : मुंबईत या मार्गावर “नो पार्किंग”
Mumbai No Parking Road News Today : बांद्रा येथे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील साहित्य ठेवण्याकरिता स्ट्राँग रूम तयार करण्यात आले आहे
मुंबई :- महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे Mumbai Lok Sabha News मतदान 20 मे ला मुंबई ठाणे, नाशिक धुळे आदी ठिकाणी होणार आहे. एकीकडे राजकीय प्रचाराचा धुराळा उडाला आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची लगबगही वाढत चालली आहे. मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे आणि मतदान शांततेत पार पाडावे याकरिता निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना राबविल्या जात आहे. Mumbai Traffic Updates
राजकीय लोकांना मतदानाच्या दिवशी कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये याकरिता पोलीस यंत्रणे कडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. मुंबई उपनगरच्या लोकसभेच्या मुख्य कार्यालय असलेल्या बांद्रे कार्यालयात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांकडून नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांनी वांद्रे वाहतूक विभागाच्या हद्दीत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, मतदान प्रक्रिया अडथळा निर्माण होऊ नये तसेच मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवण्याकरिता वाहने हे मध्यवर्ती कार्यालयापासून मतदान केंद्राबद्दल मतदान साहित्य वेळेत व तातडीने पोहोचते याकरिता नियम व नियंत्रण आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दिनांक 19 मे 2024 रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते 21 मे 2024 रात्री 12.00 वाजेपर्यंत नो पार्किंग चे निर्बंध घालण्यात आले आहे. Mumbai Traffic Updates
नो पार्कीग निर्बंध
- 18 वा रस्ता, खार (पश्चिम) :- 18 वा रस्ता हा चित्रकार धुरंदर मार्ग जंक्शन ते एस.एस. सहानी शाळा पर्यंत सर्व प्रकारचे वाहने पार्क करण्यास मनाई (NO PARKING) करण्यात येत आहे.
- 17 वा रस्ता, खार (पश्चिम) :- 17 वा रस्ता हा चित्रकार धुरंदर मार्ग जंक्शन ते रामकृष्ण मिशन मार्ग जंक्शन पर्यंत सर्व