मुंबई
Trending

Mumbai News : मुंबईच्या महापौरपदावरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये जुंपली! ‘महापौर मराठीच होणार, पण तो मनसेचाच असेल’ – संदीप देशपांडे यांचा दावा

Mumbai Latest Politics Update : आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी; ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग

मुंबई :- राज्यात लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेषतः बहुप्रतिक्षित मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच, मनसे नेते संदीप देशपांडे Sandip Deshpande यांनी मुंबईच्या महापौरपदावरून मोठा दावा करत ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार,” असा विश्वास व्यक्त केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रविवारी स्पष्ट केले की, “मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो मनसेचाच होणार.”

शिवसेना शिंदे गटाच्या पोस्टर्सवर प्रतिक्रिया

शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात ‘मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार’ असे पोस्टर लावण्यात आले होते. यावर बोलताना देशपांडे यांनी शिंदे गटाच्या दाव्यालाही महत्त्व दिले नाही आणि महापौरपदावर मनसेच दावा करेल, असे स्पष्ट केले.

महायुती विरूद्ध विरोधक

दरम्यान, यापूर्वी भाजपच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “काहीही झाले तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार,” असे ठामपणे सांगितले होते. यावर संजय राऊत यांनी “महापौर मराठीच होणार आणि तो शिवसेनेचाच होणार,” असे प्रत्युत्तर दिले होते.

मुंबई महापालिका निवडणुकीत आता महायुती विरूद्ध ठाकरे गट आणि मनसे असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजू आपापला महापौर मनपावर बसवण्याचे दावे करत आहेत. मात्र, सत्ताधारी महायुतीमध्येही अंतर्गत चढाओढ असल्याने मुंबईच्या महापौरपदाची लढत यंदा उत्कंठावर्धक होणार असल्याचे चित्र आहे. सध्या ठाकरे बंधूंमध्ये युती होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे, त्यामुळे निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0