मुंबई

Mumbai News : मुंबईत दरडीचा थरार! मध्यरात्री डोंगर कोसळून एकाच कुटुंबातील पिता-पुत्रीचा दुर्दैवी अंत

• मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्त्यांचे संकट !

मुंबई, विक्रोळी :- शुक्रवारी रात्रीच्या भयाण काळोखात आणि जोरदार पावसाच्या सरींमध्ये विक्रोळीमधील पार्कसाईट परिसरात एक काळजाला हेलावून टाकणारी घटना घडली. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास, गाढ झोपेत असलेल्या एका कुटुंबावर अचानक डोंगराचा भाग कोसळला. यात एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

काय घडलं नेमकं?

पार्कसाईटच्या वर्षा नगरमधील मिश्रा कुटुंबिय नेहमीप्रमाणे झोपले असताना, त्यांच्या घराशेजारील डोंगराचा मोठा भाग माती, दगड आणि चिखलासह त्यांच्या घरावर कोसळला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. काही कळायच्या आतच संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत 50 वर्षीय सुरेशचंद्र मिश्रा आणि त्यांची 20 वर्षांची मुलगी शालू मिश्रा यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच हाहाकार माजला.

बचावकार्य आणि पुढील तपास

घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी आरडाओरड करत मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. मातीच्या ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सुरेशचंद्र मिश्रा आणि शालू यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. सुरेशचंद्र यांची पत्नी आरती आणि मुलगा ऋतुराज हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे, तसेच डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या प्रशासनाने आजूबाजूची घरे रिकामी केली असून पुढील तपास सुरू आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago